Friday, April 19, 2024
Homeठळक घडामोडीघनकचरा व्यवस्थापन अधिनियमाची अंमलबजावनी करणार; नगराध्यक्षांची पत्रकार परिषदेत माहिती

घनकचरा व्यवस्थापन अधिनियमाची अंमलबजावनी करणार; नगराध्यक्षांची पत्रकार परिषदेत माहिती

कराड : स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये देशात प्रथम क्रमांक पटकावणार्‍या कराड नगरपालिकेची राज्य शासनाने घनकचरा व्यवस्थापनाची मॉडेल सिटी म्हणुन निवड केली आहे. यामुळे घनकचरा व्यवस्थापन 2016 च्या अधिनियमाची तंतोतंत अंमलबजावणी पुढील सहा महिन्यात शहरात करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष जयवंतराव पाटील व मुख्याधिकारी यशवंत डांगे यंानी पत्रकार परिषदेत दिली.
अरोग्य सभापती गजेंद्र कांबळे, नियोजन सभापती विजय वाटेगावकर, गटनेते सौरभ पाटील, वैभव हिंगमिरे, सुधीर एकांडे यावेळी उपस्थित होते.
मुख्याधिकारी यशवंत डांगे म्हणाले की, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणने घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 सालची अंमलबजावणी राज्यातील यंत्रणांकडुन विहित कालमर्यादित न झाल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. घनकचरा व्यवस्थापनाची योग्य अंमलबाजावणी होण्यासाठी राज्यातील 60 शहरे मॉडेल सिटी म्हणुन निवडण्याचे निर्देश दिले होते. निवडलेल्या शहरांमध्ये सहा महिन्यांच्या आत घनकचरा व्यवस्थापनाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्य शासनाकडुन 1 लाख लोकसंख्येच्या आतील शहरांत कराडची निवड करण्यात आली. याचबरोबर लोणावळा व मुळ नगरपालिकाही या गटातुन निवडण्यात आली. याशिवाय 1 लोकसंख्येच्या वरील, चंद्रपुर, नाशिक, नवी मुंबई या शहरांची निवडही करण्यात आली आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2020 सालच्या स्पर्धेची तयारी सुरू करण्यात आली आहे. या स्पर्धेचे निकष बदलण्यात आले आहेत. यात एप्रिल ते जुन व जुलै ते सप्टेंबर या तिमाहितील घनकचरा व्यवस्थापनाबाबत केलेल्या कार्यवाहिस 1000 गुण देण्यात येणार आहेत. कराड नगरपालिकेने गतवर्षीच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्यानंतर या स्पर्धेतील सातत्य राखण्याचे आवाव्हान नगरपरिषदेसमोर आहे. या पार्श्‍वभूमीवर शासनाने मॉडेल सिटी म्हणुन शहराची निवड केली आहे. शहरात यापुर्वी चांगले काम झाल्याने ही निवड झाली असुन घनकचरा व्यवस्थापनाबाबत पुढील सहा महिन्यात प्रभावी कामगिरी करण्यात येणार आहे. यासाठी स्थानिक पातळीवर कृती आराखडा करून त्याची अंमलबजावणी सुरू करण्याचे आदेश पालिकेला देण्यात आले आहेत. यांचा आढावा सचिव यांच्या पातळीवरही घेण्यात येणार आहे.नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2019 ला समोरे जाताना घनकचरा व्यवस्थापनाबाबत चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे मॉडेल सिटी म्हणुन शहराची निवड झाली आहे. येत्या सहा महिन्यांत घनकचरा व्यवस्थापना 100 टक्के कामगिरी करण्यावर भर देणार असल्याचे डंागे यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षातील स्पर्धेला कराडकर नागरिकांनी चांगले सहकार्य केले आहे. यावर्षी शहर घनकचरा व्यवस्थापनाची मॉडेल सिटी करण्याचा शासनाचा मानस आहे. यासाठी नागरिकांसह सर्व घटकांनी नगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा रोहिणी शिंदे व उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील यांनी यावेळी केले.
वसुंधरा पुरस्कारासाठी कराडचे नामाकंन
पर्यावरणाच्या संवर्धनासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन शासनाने वसुंधरा पुरस्कारासाठी दोनशे पालिकांमधुन 4 पालिकांचे नामांकन केले आहे. यात कराड नगरपालिकेचेही नामांकन झाले असुन याबाबत 30 मे रोजी शासनासमोर सादरीकरण करायचे आहे. त्यानंतर अंतिम निवड होणार आहे. यात कराड पालिका बाजी मारेल, असे विश्‍वास मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी व्यक्त केला.
पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमांत सहभागी व्हा
राज्य शासनाने वायू प्रदुषण रोखण्यासाठी 5 जुन या जागतिक पर्यावरण दिनापर्यंत रोजी उपक्रम राबवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार पालिकेच्या वतीने रोज स्वच्छता अभियान, बारा डबरे येथे घनकचरा व्यवस्थापनास भेटी, प्रदुषणाबाबत जागृती असे कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. या उपक्रमांमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आरोग्य सभापती गजेंद्र कांबळे यांनी केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular