योगेश्वर दत्तला लंडन ऑलिम्पिकचं कांस्यऐवजी रौप्यपदक?

नवी दिल्ली : 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत कांस्यपदक मिळवणाऱ्या योगेश्वर दत्तला  रौप्यपदक मिळण्याची शक्यता आहे. याचे कारण रौप्य पदक विजेता रशियन खेळाडू बेसिक खुदोखोज हा डोपिंगमध्ये दोषी आढळला आहे. त्यामुळे त्याचं रौप्यपदक आता भारताच्या योगेश्वर दत्तला मिळण्याची शक्यता आहे.

2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये 60 किलो वजनी गटात रशियाच्या बेसिक खुदोखोजने हे रौप्य पदक मिळवलं होतं. त्यानंतर 2013 साली एका कार अपघातात त्याचा मृत्यू झाला. मात्र, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) लंडन ऑलिम्पिकदरम्यान गोळा केलेल्या नमुन्यांचं पुन्हा परीक्षण केल्यानंतर त्यात खुदोखोज दोषी आढळला.