रब्बी हंगामातील शेतीच्या विमा योजनेचा जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी लाभ द्यावा: दत्तात्रय गावडे

केळघर: रब्बी हंगामातील शेतीच्या विमा योजनेचा जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी लाभ द्यावा असे आवाहन जावली पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय गावडे यांनी केले आहे.जावली पंचायत समितीच्या आवारात विमा योजनेच्या प्रबोधन रथाचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.
विमा योजनेची माहिती ग्रामपंचायत स्तरावर शेतकर्‍यांना देण्यात यावी. विमा संरक्षणासाठी शेतकरी वर्ग तयार होत नसला तरी येणार्‍या दोन तीन महिन्यात पाण्याची कमतरता भासली तर गहू हरभरा, भूईमूग, ज्वारी ही पिके अडचणी येऊ शकतात त्यामुळे शेतकर्‍यांनी विमा योजनेचा लाभ घ्यावा.
रब्बी हगांमामातील पिकांसाठी या योजनेचा लाभ चांगल्या प्रकारे घडू शकतो त्यामुळे जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी याचा लाभ घ्यावा.
यावेळी पंचायत समिती सदस्य विजय सुतार, कांताबाई सुतार, कृषी अधिकारी अविनाश मोरे, साधू चिकणे, संग्राम घाटगे, पंचायत समितीचे शेती अधिकारी आदी उपस्थित होते.