Friday, March 29, 2024
Homeताज्या घडामोडीवाई ग्रामीण रूग्णालय प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे गॅसवर

वाई ग्रामीण रूग्णालय प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे गॅसवर

वाईः वाई ग्रामीण रूग्णालयाला कायमस्वरूपी वैदयकिय अधिकारी, दोन द्वितीय श्रेणीचे वैद्यकीय अधिकारी, दोन क्लार्क, लॅब टेक्नीशीयन, नर्सेस, सफाई कामगार इत्यादी अनेक पदे रिक्त असल्याने ग्रामीण रूग्णालयाची अवस्था दयनीय झाली असून ग्रामीण रूग्णालयाची सर्वसोयीनी युक्त असतानासुध्दा तालुक्यातील सर्वसामान्य नागरीकांना शासकीय वैद्यकीय सेवेपासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे गरीब रूग्णांना नाविलाजास्तव खाजगी रूग्णालयात उपचार घ्यावे लागल्याने नाहक अर्थिक भुर्दड सहन करावा लागत आहे. यामुळे अनेक वेळा नागरीकांच्या रोशाला कर्मचा-यांना सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे बरेच दिवस वैदयकिय अधिकार्‍याविना गैरसोयीत असलेल्या वाई ग्रामीण रूग्णालयाविषयी नागरीकांमध्ये संतापाची लाट आहे.तरी जिल्हा प्रशासनाने तालुक्याच्या मुख्य ठिकाणी असणार्‍या रूग्णालयाकडे गांर्भियाने लक्ष देवून सर्व पदे भरण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच ग्रामीण रूग्णालयाला जिल्हा उपरूग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी होत आहे.
रूग्णालयात दररोज वाई शहरातून व तालुक्यातून तीनशे ते चारशे बाहय रूग्ण उपचारासाठी येतअसतात. रूग्णालयात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारीच नसल्याने रूग्णांची ससेहोलपट होत आहे. तसेच ऐनवेळी अपघात किंवा दुर्घटना घडल्यास पोस्टमार्टम करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी नसल्याने मृत्यूनतंरही प्रेताची हेळसांड होताना दिसत आहे. दरम्यान सोमवार दिनांक15एप्रिल रोजी जनार्दन राजाराम संकपाळ यांनी कृष्णानदीच्या डोहात आत्महत्या केली. त्यांच्या नातेवाईकांनी पोस्ट मार्टमसाठी ग्रामीण रूग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकार्‍याविना चार तास ताटकळत थांबावे लागले. त्यामुळे वाईकरांनी संताप व्यक्त केला. रूग्णालयात गरजेच्या चाळीस टक्केच कर्मचारी आहेत.साठ टक्के पदे रिक्त असल्याने कर्मचार्‍यांवर कामाचा ताण येतआहे. तरी शासनाने व जिल्हा शल्यचिकित्सकांनी त्वरीत लक्ष घालून रिक्त पदे भरावीत व रूग्णालयात होणार्‍या पेंशटची हेळसांड थांबवावी.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular