पाटणमध्ये ग्रंथ व साहित्य संमेलनाचा ग्रंथ दिंडीने दिमाखात शुभारंभ.

पाटण :- ( शंकर मोहिते) – स्वातंत्र्य सैनिक स्व. बाळासाहेब उर्फ भडकबाबा पाटणकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित ग्रंथ महोत्सव व साहित्य संमेलनाचा ग्रंथदिंडीने पाटण येथे दिमाखात शुभारंभ झाला. सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर व पत्रकार विक्रांत कांबळे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीस सुरूवात झाली.

स्वातंत्र्य सैनिक स्व. बाळासाहेब उर्फ भडकबाबा पाटणकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सालाबादप्रमाणे याहीवर्षी साहित्य संमेलन व ग्रंथ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने विविध मान्यवर साहित्यिक, प्रशासकीय अधिकारी, यांच्यासह विविध शाळा, महाविद्यालये, बालवाड्या, प्राथमिक शाळाचे आकर्षक चित्ररथ सहभागी झाले होते. विद्यार्थी, साहित्यप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

संमेलनाचे स्वागताध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर, संयोजन समितीचे सदस्य पत्रकार ए. व्ही. देशपांडे, सोमनाथ आग्रे, करणसिंह पाटणकर,  दादासाहेब कदम, लक्ष्मण चव्हाण, विजया म्हासुर्णेकर, आयेशा सय्यद, विना नांगरे, धनश्री मोरे, अर्चना देशमुख, विद्या शिंदे, अनिल बोधे, अतुल प्रभाळे, अमित बेडके, विशाल देसाई, प्रतिभा सावंत, अतुल सावंत, शशिकांत शिंदे, थोरात मॅडम, माने, शिंदे, कराड आदी मान्यवर उपस्थित होते.

ग्रंथदिंडीत फुलराणी बालक मंदीर, कै. ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कूल, पाटणकर प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले व मुली यांच्यासह विविध शाळाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी पारंपरिक पोशाखात सहभागी झाले होते. नगरपंचायतीपासून मान्यवरांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर ग्रंथदिंडी जुना बसस्थानक, झेंडा चौक, व्यापारी पेठ, लायब्ररी चौक, राजवाडा, तहसील कार्यालयमार्गे संमेलनस्थळी पोहोचली. संमेलनस्थळी दिंडीचे आगमन झाल्यावर स्वातंत्र्य सैनिक स्व. भडकबाबा पाटणकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विविध श्रेत्रातील मान्यवर व साहित्यिक उपस्थित होते. सूत्रसंचलन सोमनाथ आग्रे यांनी केले.