वळीवाच्या परतीच्या पाऊसात म्हैशी गेल्या वाहून ; एका म्हैशीचा अंत , रेडकू गंभीर जखमी , तीन म्हैशी अद्याप बेपत्ता

 

पाटण : – पाटण तालुक्यात ढग पुटी मुळे मारुल तर्फ पाटण येथील ओढ्याला आलेल्या पाण्यातुन पाच म्हैशी वाहुन गेल्या त्यातील एक म्हैशीचा मृत्यु झाला तर एक रेडकू गंभिर जखमी झाले असुन तिन म्हैशी अद्याप ही बेपत्ता आहेत दरम्यान मणदुरे विभागात ही ढग फुटी मुळे अतोनात नुकसान झाले आहे
या बाबत सविस्तर माहीती अशी की मारुल तर्फ पाटण येथील उत्तम जयराम यमकर हे गुरुवार दीनांक ४आक्टोबंर रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वाडांर कोडीं या शेवारात आपल्या म्हैशी चारावयास गेले होते दीवस भरात म्हैशी चारुण झाल्यावर घरी परतत असताना सायंकाळी साडे पाचच्या सुमारास अचानक आलेल्या अवकाळी पावसाने ढग फुटी झाल्याने वाडांर कोडिं येथिल असनाऱ्या ओढ्याला आलेल्या पाण्या मुळी ओढा पारकरीत असताना त्यांच्या पाच म्हशी वाहुन गेल्या शुक्रवार दीनांक ५ आँक्टोबंर रोजी सकाळ पासुन शोध घेत असताना महाट मळी येथे मृत्य अवस्थेत एक म्हैस आढळुन आली तर एक रेडकु गंभिर अवस्थेत अढळुन आले तर अद्यापही तिन म्हैशी बेपत्ता आहेत सदर घटनेची खबर महसुल विभागाला कळताच तहसिलदार रामहरी भोसले यांनी हळेवाक मडंलाचे मडंल आधिकारी ए.एस सपकाळ मारुल तर्फे पाटण सजाचे तलाटी भरत जाधव यांनी घटना स्थळी जावुन पंचनामा केला असुन उत्तम जयराम यमकर यांचे एक लाख दहा हजाराचे नुकसान झाले आहे तर त्यांचे तिन म्हैशी बेपत्ता आहेत त्याचा शोध चालु आहे.
दरम्यान पाटण तालुक्यातील मणदुरे विभागाला गुरूवारी सायंकाळी उशिरा अचानक आलेले चक्री वादळ तसेच वळीव पावसाने ऊस पिकाला आडवे करून टाकले. तर अतिवृष्टीतून वाचलेल्या भात पिकांची काढणी सुरू असताना या चक्री वादळासह जबरदस्त तडाखा बसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मणदुरे विभागात 2010 पासून साखरी-चिटेघर लघुपाट बंधारे प्रकल्पात पाणीसाठा केला आहे. या पाण्यामुळे साखरी, चिटेघर, मेंढोशी, बिबी, सुरूल, तामकणे, घाणव याठिकाणी बागायती शेती केली जाते. यात प्रामुख्याने ऊस पीक घेतले आहे. यावर्षी ऊस पिकाची वाढ खुंटली आहे. तर गुरूवारी दुपारपासून अचानक काळे ढग दाटून आले होते. यानंतर सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अचानक चक्री वादळ सुरू झाले. त्यानंतर विजांच्या कडकडाटासह पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला.
केरा विभागातील बोंद्री-जाईचीवाडी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडल्याने दिवसभर उजेड तर रात्री अंधारात चाचपडत बसावे लागत होते. हा प्रकार गेल्या दोन-तीन दिवसांपासून या परिसरात सुरू असून याची वीज वितरण कंपनीने खबरदारी घेवून विद्युत पुरवठा सुरळीत करावा. अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांमधून होत आहे. दरम्यान, या चक्री वादळी पावसाने साखरी, मेंढोशी, चिटेघर, घाणव या परिसरातील उभा ऊस आडवा झाला असल्याचे पहावयास मिळत आहे.
सध्या विभागात कोल्हापुरी पध्दतीचे भात पीक काढण्याची धांदल सुरू आहे. यावर्षी अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीतून वाचलेल्या तसेच अतिवृष्टीत कुजलेल्या भात पिकाची काढणी सुरू आहे. सध्या रब्बी हंगामासाठी शेती रिकामी करण्याचे का सुरू आहे. मात्र अचानक पडलेला वळीव पाऊस तसेच चक्री वादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नशिब बलवतर म्हणुन वाचले उत्तम जयराम यमकर.
यमकर हे ओढा पार करीत असतातना. ओढ्याला पाण्याचा लोट आला जयराम यमकर यांनी तातडीने माघारी फीरले ते माघारी फीरले नसते तर ते ही पाण्यात वाहुंन गेले असते मात्र त्यांचे डोळ्या देखत त्यांच्या म्हैशी वाहुन गेल्याने त्याना मोठा धक्का बसला असुन दुध देणार्या म्हैशी वाहुन गेल्याने त्यांचे आर्थीक मोठे नुकसान झाले आहे

सध्या मणदुरे विभागात अतिवृष्टीतून वाचलेल्या भात पिकाची काढणी, कुजलेले भात काढून शेती रिकामी करण्याचे काम सुरू आहे. मात्र अचानक आलेले चक्री वादळ व वळीव पावसाने ऊस पीक आडवे झाले आहे. संबंधित विभागाने तातडीने पंचनामे करावेत.अशी मागणि चिटेघर येथील अशोक शिंदे या शेतकर्यानी केली.