म्हासुर्णेला वादळी वारे , पावसाने झोडपले

मायणी प्रतिनिधी:-  (सतीश डोंगरे) म्हासुर्णे ता.खटाव परिसरात रविवारी दुपारी वादळी वारे व पावसाने झोडपुन काढले.या वादळी पावसाने अनेक झाडे बुंद्यातुन उकरुन पडली.झाडे पडुन मोठे नुकसान झाले आहे.पाऊस सुरु असताना विजेचा लपंडाव सुरु होता.पाऊस व वाराबरोबर परीसरातील विज गायब झाली होती.
म्हासुर्णे व परिसरात रविवारी दुपारी चारच्या सुमारास वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली वादळी वारामुळे अनेक ठिकाणी झाडे बुंद्यातुन उपटुन पडली व झाडांच्या फांद्या तुटुन पडल्या.तर काही ठिकाणी फांद्या तुटल्या.उष्णेतेने हैराण झालेल्या जनतेला व चातकालाप्रमाणे पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांला आज दुपारी वळीवाच्या पावसाने दिलासा दिला गेल्या आठदिवसापासुन या भागाला पावसाने हुलकावणी दिली होती. मात्र आज दुपारी तीन वाजल्यापासुन ढग दाटुन आले.दुपारी चार नंतर जोरदारवारे सुरु झाले.सुमारे तास ते दिड तास चांगला पाऊस पडला पाऊस सुरू होण्याच्या अगोदरच विज गायब झाली होती .ती रात्रभर विज गायबच होती.बरेच ठिकाणचा आसपास गावचा विजपुरवठा गायब झाला होता.