जिल्ह्यात मुसळधार; जनजीवन विस्कळीत ,कोयना 67 टीएमसी

सातारा : जूनच्या पहिल्या आठवड्यात सरासरही गाठू न शकणार्‍या पावसाने आष्लेषा नक्षत्राच्या मुहूर्तावर जिल्ह्यात दमदार पुनरागमन केले. सातारा जिल्ह्यात सकाळपासून संततधार पावसाने जनजीवन गारठले. गेल्या 24 तासात महाराष्ट्रात सर्वांधिक महाबळेश्‍वरमध्ये 319.5 मिमी. पावसाची नोंद झाली. पश्‍चिम किनारपट्टीकडून निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्यामुळे कोकणापासून ते मध्य महाराष्ट्रापर्यंत सातत्याने पावसाच्या जोरदार सरी कोसळत असून सैराटलेल्या पावसाचा ट्रेलर सातारा जिल्ह्याने अनुभवला. कोयना धरणात तब्बल पावनेपाच टीएमसी पाणीसाठ्यात वाढ झाली असून धरणात 67.38 दशलक्ष घनमीटर इतकी पाण्याची पातळी झाली आहे. कोयना नदीच्या पात्रात सातत्याने वाढ होत असून काठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
संगमनगर पूला पाण्याखाली गेल्याने पलिकडील 23 गावांचा संपर्क तुटला आहे.
सातारा : सातारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून धुवाँधार पाऊस पडत असून कोयना धरणाच्या पाणी साठ्यात आज सायंकाळी 6 पर्यंत 67.35 टीएमसी पाणीसाठा झाल्याची नोंद झाली आहे. तर महाबळेश्‍वर येथे विक्रमी 109 मि.मी. तर निरा-देवधर धरण पाणलोट क्षेत्रात सर्वात जास्त 102 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
कोयना थरणात 105 टीएमसी पाणी साठ्याची क्षमता असून 31 हजार 404 क्युसेक्स गतीने पाण्याची आवक धरण क्षेत्रात होत आहे. तर कोयना येथे 58 मि.मी., नवजा 59 मि.मी. पाऊस झाला आहे. धोम धरणात 7.87 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तर 31 मि.मी. पाऊस झाला आहे तर कण्हेर धरणात 6.10 टीएमसी पाणीसाठा झाला असून 2 मि.मी. पाऊस झाला आहे. भाटघर धरणात 15.84 टीएमसी पाणीसाठा झाला असून 22 मि.मी. पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. वीर धरणात 6.13 टीएमसी पाणीसाठा झाला असून 2 मि.मी. पाऊस झाला आहे. उरमोडी धरण क्षेत्रात 7.25 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तर 16 मि.मी. पाऊस झाला आहे. धोम-बलकवडी धरण क्षेत्रात 3.64 टीएमसी पाणीसाठा झाला असून 94 मि.मी. पाऊस झाला आहे. महु धरणात 0.229 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तर 68 मि.मी. पाऊस पडला आहे. हातेघर धरण क्षेत्रात 0.926 टीएमसी पाणीसाठा असून 78 मि.मी. पाऊस पडला आहे. नागेवाडी धरणात 0.128 टीएमसी पाणीसाठा झाला असून 64 मि.मी. पाऊस पडला आहे. मोरणा-गुहेघर धरण क्षेत्रात 0.978 टीएमसी पाणीसाठा झाला असून 51 मि.मी. पाऊस झाला. उत्तरमांड धरण क्षेत्रात 0.66 टीएमसी पाणीसाठा झाला असून 3 मि.मी. पाऊस झाला. तारळी 4.262 टीएमसी पाणीसाठा झाला असून 10 मि.मी. पाऊस झाला. निरा-देवधर धरणात 8.02 टीएमसी पाणीसाठा झाला असून 102 मि.मी. पाऊस झाला आहे. वांग धरण क्षेत्रात 0.247 टीएमसी पाणीसाठा झाला असून 15 मि.मी. पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात पावसाची संपुर्ण दिवसभर संततधार सुरूच असून या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पडत असलेला पाऊस हा खरीप पिके, हायब्रीड, भुईमूग, भात, नाचणी, वरी, घेवडा या पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरला आहे.
भिलार : भिलार, पाचगणी व महाबळेश्‍वर संपूर्ण महाबळेश्‍वर तालुक्यात कालपासुन कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने पूर्ण जनजविन विस्कळीत झाले आहे. महाबळेश्‍वर येथे वेण्णालेकजवळ नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतुक व्यवस्था कोलमडली तर पाचगणीत ठिकठिकाणी पडझडीच्या घटनंाबरोबर महाकाय वृक्ष उन्मळून पडल्याने मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागले आहे. तर घाटरसत्यामध्ये ठिकठिकाणी दरडी कोसळल्याने घाट रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे.
पाचगणीमध्ये काल रात्रीपासुन मुसळधार पाऊस कोसळत असुन बेल एअर हॉस्पीटल आवारात 60 फुट उंचीचे महाकाय सिल्वहर ओकचा वृक्ष मारूती अल्टो के एल 36 सी 7319 व नवी कोरी दुचाकी एक्सेस एम एच 11 सी सी 1639 या दोन गाड्यावंर पडल्याने दुचाकी पुर्णपणे निकामी झाली आहे. सदरचा पंचनामा तलाठी शशिकांत वणवे यंानी केला असुन यामध्ये अल्टोचे 60 हजार व दुचाकीचे 70 हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. तर डॉ.आंबेडकर कॉलनीमध्ये एक वृक्ष विजेच्या तांरासह इमारतीवर पडल्याने नुकसान झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डन येथेही दोन वृक्ष कोसळले आहेत. पाचगणी येथे कोंडीबा प्रभाळे पथवरील मीलर बिल्डंींगची भिंत कोसळल्याचीही घटना घडली.
सार्वजनीक बांधकाम विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे भोसे खिंड, पारसी पॉईंट, डॉन अ‍ॅकॅडमी, बिल्लीमोरीया हायस्कूल जवळील मुख्य रस्त्यांवर पाणी साठल्याने वाहनचालकंाना व पर्यटकांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अपघांताची शक्यता निर्माण झाली आहे. तर  पाचगणी -काटवली घाटात धनदांडग्यांच्या रस्त्यावरील कामाबरोबरच छोट्यामोठ्या दरडीं कोसळल्याने संपूर्ण पाणी रस्त्यावरून वहात असल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. बांधकामाचे वाळु व मुरूम रस्त्यावर आल्याने वाहतुकीवर परीणाम जाणवला.
महाबळेश्‍वर च्या वेण्णा लेक जवळ नदीचे पाणी रस्त्यावरून वाहु लागल्याने महाबळेश्‍वरकडे जाणार्‍या वाहतुकीवर मोठा परीणाम जाणवत आहे. तर लिंगमळ्यातील संपूर्ण शेती पाण्याखाली आली आहे. कालपासुन सतंतधारपणे पाऊस कोसळत असल्याने सर्व परीसर जलमय झाला आहे. तर पावसामुळे विजवितरणातही खेळखंडोबा चालु आहे. विजा जाण्याचे प्रकार वारंवार घडत असुन बर्‍याचदा विजवितरणचा दिवसा उजेड व रात्री अंधार अशी परीस्थीती निर्माण झाली आहे. महाबळेश्‍वरला आज सकाळपर्यंत 3509.3 मीमी(16 इंच) नोद झाली आहे.
केळघर ः गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाने विभागातील नदी, ओढे काठच्या शेतजमींनीचे मोठे नुकसान झाले आहे.तर मुसळधर पावसाने आंबेघर येथे ओढ्यावरील फरशी पुलावर पाणी वाहू लागल्याने तसेच केळघर-केडंबे रस्त्यावर पुनवडी येथील वेण्णा नदीच्या पूलावर सुमारे चार-ते पाच फूट पाणी आल्याने वाहतूक तीन ते चार तास वाहतूक पूणर्पणे ठप्प होती.
गेले चार दिवस परिसरात संततधार पाऊस पडत होता.काल दुपारपासून पावसाने रौद्ररूप धारण केल्याने वेण्णा नदीसह परिसरातील ओढे,नाले दुथडी भरून वाहत आहेत. जोरदार पावसाचा फटका नदीकाठच्या व ओढ्याजवळच्या भातशेतीस बसला आहे.जावळी तालुक्याच्या सीमेवर असणाऱया डोंगरमाथ्यावरील मोळेश्वर येथील शेततळे अतिवृष्टीमुळे फुटल्याने रेंगडी व मुकवली माची येथील कांताराम कासुरडे,सरजेराव खुटेकर, झिमू खुटेकर, शंकर खुटेकर, बबन खुटेकर, लक्ष्मण  खुटेकर,सुनील खुटेकर या शेतकरयांच्या भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.तसेच  रेंगडी गावाकडे जाणाऱया रस्त्यावर दगड-मातीचा मलमा येवून बसल्याने वाहतुकीस अडथळा निमार्ण होत आहे.
काल पासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे वेण्णा नदीला पूर आला आहे. गेल्या दहा वषार्त सवार्धिक पाऊस असल्याचे नागरिकांनी सांगितले.मेढा-केळघर रस्त्यावरील आंबेघर गावच्या हद्दीतील फरशी पूलावरून पाणी येत असते. हा रस्ता पूणर्पणे पाण्याखाली जातो.काही वेळा वाहनचालक या रस्त्यावरून पाणी जात असतानाही धोकादायक पद्धतीने वाहने चालवत असतात. त्यामुळे बांधकाम विभागाने या फरशी-पूलाची उंची वाढवण्याची आवश्यकता आहे.या मुसळधार पावसामुळे केळघर परिसरातील बहुतांशी गावातील भात शेतीचे ताली पडून तसेच कडधान्ये, बटाटा, स्टॉबेरी पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.
जावळी तालुक्यात गेल्या चोवीस तासात मंडलनिहाय पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये पुढीलप्रमाणेः सवार्धिक पावसाची नोंद केळघर मंडलात झाली असून ती 176.2 मिलीमीटर इतकी आहे.बामणोली (120.4),मेढा (100.4), करहर (99.8),आनेवाडी (32.4),कुडाळ (27.2)केळघर परिसरात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून संबंधित विभागाने तातडीने करून शेतकरयांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरयांनी केली.
 औंध परिसरात रिमझिम पावसाची हजेरी
औंध: औंधसह परिसरात मंगळवारी सकाळी पावसाने काही वेळ विश्रांती दिल्यानंतर दुपारनंतर पावसाने पुन्हा सुरुवात केली. सायंकाळी पावसाची रिमझिम सुरु होती.
मंगळवार हा औंध चा आठवडी बाजारचा दिवस असल्याने सकाळ पासूनच औंध येथे बाजारामध्ये येणार्या औंध भागातील अनेक गावांमधील नागरिक,शेतकरी, महिला,व्यापारी वर्गाची वर्दळ होती. पावसामुळे बाजारातील उलाढालीवर ही परिणाम जाणवत होता.सकाळी  पावसाच्या हलक्या सरी पडल्यानंतर दिवसभर पावसाने उघडीप दिली होती .दुपारी 2नंतर पुन्हा पावसाची रिमझिम सुरु झाली. ढगाळ वातावरण व जोरदार वारे ही वाहत होते. त्यामुळे हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला होता.
 सायंकाळी पाचनंतर पावसाने पुन्हा सुरुवात केली.औंध भागात पावसाने सातत्य राखल्याने सर्वत्र उत्साहाचे  वातावरण असून शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.सलग दोन दिवस मुरवणीचा पाऊस झाल्याने पिकांच्या वाढीसाठी हा पाऊस महत्त्वाचा ठरणार आहे.
कराड तालूक्यात पावसाची रिपरिप
कराड :गेल्या तीन दिवसापासून कराड परिसर व तालूक्यात पाऊस सर्कीय झाला आहे. पावसाच्या हालक्यासरी पडत असल्या तरी त्या सतत आहेत. पडणारा पाऊस शेतीसाठी उपयुक्त आहे. त्यामुळे शेतकरी राजा समाधान व्यक्त करीत आहेत.

 

जुन महिन्यात पावसाने हुलकावनी दिल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण होते. परंतु पाऊस जुलै महिन्यात सर्कीय झाला. त्यामुळे शेतातील पिकांनी तग धरला. तसेच तालूक्यातील ओढे, तलाव, विहीरीमध्ये पाणी साचले. जनावरांनाही डोंगरदर्‍यातील चारा उपलब्ध झाला. त्यानंतर पावसाने पुर्णपने उघडीप दिली होती. मात्र तीन दिवसापासुन पावसाची सर्वत्र रिपरिप चालू झाली आहे. पडत असलेला पाऊस जिरवणीचा असल्याने तो पिकांना पोषक आहे. त्यामुळे शेतकरी समाधानी आहे.