हिंदवी दुर्गात्सव मंडळाच्यावतीने सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न ; कलाविष्काराने सर्व म्हासुर्णेकर झाले मंत्रमुग्ध


म्हासुर्णे (प्रतिनिधी  तुषार माने ) : म्हासुर्णे ता.खटाव येथे सालाबादप्रमाणे हिंदवी दुर्गात्सव मंडळाने दुर्गा देवी स्थापना उत्साहात केली.सध्या जल्लोषात सुरू असलेल्या दुर्गाउत्सवाचा लाभ संपुर्ण देशभरात भाविक भक्त घेत आहेत प्रत्येक वर्षी म्हासुर्णेतील हिंदवी दुर्गामाता मंडळाकडुन विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवुन सामाजिक प्रयत्न केला जातो. या वर्षी मंडळाने म्हासुर्णेतील लहान मुलांच्या कलागुंणाना वाव मिळावा म्हणून विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमामध्ये मनोरंजनाबरोबर प्रबोधन करण्यात आले.हा कार्यक्रम हिंदवी नवरात्र मंडळाने आयोजित केल्यामुळे लहान लहान मुला मुलींना आतापासुनच कला व वेशभुषेचे ज्ञान आत्मसात होत आहे.या कार्यक्रमात शेतकरी गिते,देवी गिते,जोगवा गित,धार्मिक गिते अशा पध्दतीच्या गितांनी सर्व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले सर्व उपस्थित ग्रामस्थांनी सर्व गाण्यांना टाळ्याच्या गजरात दाद दिली.सर्व गाणी व डान्स प्रशिक्षण म्हणून अनिल जाधव(फोटो ग्राफर)व विजय गुरव (पुजारी) यांनी विशेष सहकार्य केले.अशा प्रकारचा वेगळा कार्यक्रम आयोजन केल्याबद्दल हिंदवी दुर्गात्सव मंडळाचे संपुर्ण गावातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.मंडळाने अशाच प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम सादर करावेत अशी मागणी ग्रामस्थाकडुन होत आहे.मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमावेळी हिंदवी नवारात्र मंडळाला सतत मदत करणारे पोलीस पाटील संभाजी माने, गुलाब वायदंडे,नंदकुमार सुतार,अनिल जाधव यांचा सत्कार अनुक्रमे सरपंच सचिन माने,ग्रामपंचायत सदस्य तुषार माने,विजय गुरव,अशोक माने यांच्या हस्ते करण्यात आले.संपुर्ण सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हिंदवी मंडळाचे अध्यक्ष नितिन माने,पोलिस पाटील संभाजी माने,विठ्ठल जाधव,आत्माराम सरकाळे,स्वप्निल माने,शिवाजी माने,सागर थोरात ,अनिल जाधव,विजय गुरव,दिलीप माने,सागर थोरात,तुषार जाधव,सोन्या जंगम,अर्जुन यमगर (गुरुजी),नारायण थोरात,प्रकाश वेदपाठक,आबा पाटील,डॉ.श्रीराम कुलकर्णी ,अशोक माने,सनी माने यांनी विशेष परिश्रम घेतले.