हिंदुत्व श्री 2018 सातारचा फैय्याज शेख 

सातारा : बॉडी बिल्डर्स असो. ऑफ सांगली मान्यतेने, हिंदूत्व मित्र मंडळ आयोजित सातारा, सांगली, कोल्हापूर, जिल्हा मर्यादित शरीरसौष्ठव स्पर्धा सांगली येथे संपन्न झाल्या. कै. समीर (टिपू) मुजावर यांच्या स्मरणार्थ या स्पर्धा होत्या. या स्पर्धेत 70 स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन आशियाई पंच राजेंद्र हेंद्रे, विनायक केरीपाळे, विजय काकडे, इनायत तेरदाळकर, मुरली वस्तस, राजेश वडाम यांच्या हस्ते झाले.
या स्पर्धेत 50 ते 55 वजनगटात अनुक्रमे नितीन पाडळे, सुधीर गायकवाड, शाहीन मणीयार, सरदार माळी, दिपक चवरे विजयी ठरले. 55 ते 60 वजन गटात अनुक्रमे कुतुबुद्दीन बाली, संजय केसरकर, शुभम मोहिते, शुभम बनकर, रजत शिंदे विजयी ठरले. 60 ते 65 वजन गटात अनुक्रमे रणजित चौगुले, प्रफुल्ल नायकवडी, विशाल निकम, ज्ञानसेन निशाद, उमर विजयी झाले.65 ते 70 वजन गटात अनुक्रमे फैय्याज शेख, विक्रम कारंडे, चंद्रकांत नाईक, विवेक सकपाळ, ऋषीकेश पाटील, 70 ते 75 वजन गटात अनुक्रमे अमित माळवदे, वैभव जाधव, अमर भंडारे, संग्राम कोटक, संकेत गुजर विजयी ठरले. 75 वरील वजन गटात अनुक्रमे विश्‍वनाथ बकाळी, गौरव यादव, उमेश कदम, अभिजीत चव्हाण, आदिल बागवान विजयी ठरले.
पंच म्हणून राजेंद्र हेंद्रे, राजेश  वडाम, इनायत तेरदाळकर, मुरली वत्स, संदीप यादव व दिलीप माने यांनी काम पाहिले.