Friday, March 29, 2024
Homeठळक घडामोडीजिहे गावच्या हद्दीत आढळला मानवी सांगाडा

जिहे गावच्या हद्दीत आढळला मानवी सांगाडा

सातारा: जिहे, ता. सातारा गावच्या हद्दीत कृष्णा नदीत मानवी हाडे सापडल्याने खळबळ माजली आहे. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्यात झाली आहे याची फिर्याद पोलिस पाटील किरण जगन्नाथ फडतरे (वय 35) यांनी दिली आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, आज सकाळी धामणेर येथील मच्छीमारी करणारे धर्मा वामन पवार हे कृष्णा नदीच्या नवीन पूलाखाली नदीत माशाचे जाळे टाकले होते. त्यावेळी त्याच्या जाळ्यात हाडाचा सापळा आढळून आला. त्यांनी याची खबर पोलिस पाटील किरण फडतरे यांना दिली.
फडतरे यांनी तालुका पोलिस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पो. नि. दत्तात्रय नाळे यांनी घटनास्थळी जावून झाडे ताब्यात घेतली. यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख विजय पवार यांनीही घटनास्थळी भेट दिली.

 

दरम्यान, जिहे गावानजिकचा एक वृध्द पाण्याच्या पूरात वाहून गेला होता. ही हाडे त्याचीच असू शकतात असा अंदाज पोलिसांनी बांधला आहे. त्यामुळे त्या हाडांचा डीएनए स्टेस्टसाठी पुणे येथे लॅबमध्ये पाठविण्यात येणार आहेत.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular