मेढा नगरीच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करीन :- आ. शशिकांतजी शिंदे

मेढा / प्रतिनिधी :-
मेढा नगरीच्या सर्वांगीन विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करीन व जी प्रलंबित कामे आहेत ती ही पूढील कालावधीत मार्गी लावू . तुम्ही जी जी . कामे सुचवाल त्यांना प्राधान्याने मार्गी लाव०यासाठी निश्चित प्रयत्न करीन असे आश्वासन आ . शशिकांतजी शिंदे यांनी दिले.
मेढा नगरपंचायत मेढा शहरातील शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका सौ नीलम जवळ,कू गौरी पवार तसेच पुष्पाताई तांबोळी यांच्या प्रभाग क्र.९, प्रभाग क्र. १३, प्रभाग क्र. १४ मधील मंजुर झालेल्या रस्त्याच्या कामांचा शुभारंभ सातारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा जावली चे सुपुत्र आमदार शशिकांतजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी शिवसेनेचे माजी आमदार सदाभाऊ सपकाळ, शिवसेनेच नेते एस एस पार्टे गुरुजी, शिवसेनेचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी यांचे उपस्थीत संपन्न झाला.
या प्रसंगी माजी आमदार सदाशिवभाऊ सपकाळ याप्रसंगी बोलताना म्हणाले, मेढा शहराचा सर्वांगीन विकास झाला पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त निधी ग्रामविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडून आणू असे सुचित करून ते पूढे म्हणाले मेढा नगरीत कार्यकर्त्यांची संघटना मजबूत होत असून शिंदे साहेबांनी त्यांना पूर्णपणे ताकद दयावी असे सुचित केले.
मेढा शहारातील महत्वाचा प्रश्न म्हणजे स्वच्छता गृह व सुसज्ज स्मशान भूमी .हे प्रलंबीत प्रश्न असून इतर समस्यांचा ही ऊहापोह करून ते प्रश्न मार्गी लावावेत असे शिवसेनेचे नेते एस एस् .पार्टे गुरूजी यांनी सुचित केले.

याप्रसंगी मेढा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नारायणराव शिंगटे गुरुजी, शिवाजीराव देशमुख, सुरेशजी पार्टे, प्रकाश कदम ,सचिनजी जवळ, सचिन करंजेकर , प्रकाश कोकरे, , दीपक कदम, सुनिल देशमुख, बाळासाहेब पंडीत ,अंकुश सावंत, सुनील बेंद्रे,राजू (मामा) साळुंखे, लक्ष्मण आगुंडे, लोकमान्य टिळक चौक व व्यायाम मंडळ परिसरातील रहिवासी अण्णा ईगावे,सचिन ओतारी, राजेंद्र इगावे, राजेंद्र रेळेकर,रवींद्र मुळे, दिगंबर ईगावे, अशोक शेटे, अमित लकेरी, भाईजान आत्तार, कमलाकर शेटे ,दिलीप सपकाळ, विनायक तोडकर,मोहन देशमुख तसेच वेण्णा कॉलनी चे रहिवाशी ज्येष्ठ नागरिक सुकाळे गुरुजी डॉ आनंदराव दळवी , नारायण भोसले , संपतराव मालुसरे, गणेश नाना जवळ, चिकणे गुरुजी , सपकाळ गुरुजी आदी उपस्थित होते . या कार्यक्रमाचे आभार देशमुख गुरुजी यांनी मानले .
फोटो
रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करताना आ . शशिकांतजी शिंदे, समवेत माजी आ. सदाशीवभाऊ सपकाळ , एस एस् पार्टे गुरूजी, नगरसेविका व मान्यवर.