मी मुख्यमंत्र्यांना भेटून कोयना धरण ग्रस्तांच्या मागण्या मान्य करून घेणार :- खा. श्री. छ. उदयनराजे भोसले.

पाटण:- साठ वर्षे झाले धरण होऊन, पण धरणग्रस्तांचे प्रश्न काही सुटले नाहीत, धरणामुळे काहीजण मंत्री झाले संत्री झाले, त्यामुळे तुमच्यावर उपासमारीची ही वेळ आली आहे, येत्या दोन तीन दिवसात मी मुख्यमंत्र्यांना भेटून कोयना धरणग्रस्तांच्या सर्व मागण्या मान्य करून घेणार आहे असे सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले.
खा. उदयनराजे भोसले यांनी आज कोयनानगर येथे आंदोलन स्थळी भेट देऊन प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते, यावेळी राजेंद्रसिंह यादव उपस्थित होते,
यावेळी खा. उदयनराजे म्हणाले की, कोयना धरण होऊन ६० वर्षे झाली, पण प्रश्न काही सुटले नाहीत, मी असतो तर सोडविले असते, त्यावेळेस राज्यकर्त्यांनी सकारात्मक भुमिका स्विकारली असती तर आज तुमच्या वर ही वेळ आली नसती,धरण झाले, धरणामुळे कोणी मंत्री झाले, कोणी संत्री झाले त्यामुळे आज तुमच्यावर उपासमारीची ही वेळ आली आहे,मी पक्ष बिक्ष बघत नाही,
राजकीय मंडळी नुकती आश्वासने देतात पण कार्यवाही करत नाहीत, दोष त्यांचा नाही तुमचा आहे, लोकशाहीचे तुम्ही राजे आहात तुमच्यामुळे मी आहे, मी माझ्या परीने निश्चितपणे प्रयत्न करतो, तुमच्या मागण्यांसंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करून मागण्या मंजूर करून घेतो,मी नुकतीच आश्वासने देत नाही तर मी काम करून घेतो, मी व डाॅ. भारत पाटणकरांनी अनेक चळवळी बघितल्या आहे, या भागाला अजूनही न्याय मिळाला नाही, तुम्ही तुमच्या हक्कांसाठी भांडता, तुमच्या हक्कांवरती कोणी बाधा आणत असेल तर मी त्यांना सोडणार नाही,मी येत्या दोन-तीन दिवसांत मुख्यमंत्र्यांना भेटून कोयना धरणग्रस्तांच्या सर्व मागण्या मान्य करून घेणार आहे, तुमच्या तीन पिढ्या बरबाद झाल्या पण पुढची पिढी होणार नाही याचे मी तुम्हाला वचन देतो, जे भ्रष्टाचार करत आहेत त्यांच्यावर अ‍ॅक्शन नाही हा भ्रष्टाचाराचा पैसा पुनर्वसनाच्या कामासाठी वापरला असता तर कधीच झाले असते असे खा. उदयनराजे यांनी यावेळी सांगितले,