Friday, April 26, 2024
Homeठळक घडामोडीखटाव तहसीलदारांचा अवैध वाळू वाहनांवर कारवाईचा धडाका ; लाखोंचा ऐवज जप्त करून...

खटाव तहसीलदारांचा अवैध वाळू वाहनांवर कारवाईचा धडाका ; लाखोंचा ऐवज जप्त करून महसूल विभागाने केली कारवाई ; वाळू माफियांनी घेतला धसका

 

वडुज:  वडूज ते कराड रस्त्त्यावरील राज्याचे कुर्ल नजीकच कराडकडे अवैध्यरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या तीन डंपर व एक ट्रक वर धडक कारवाई करुन महसूल विभागाने डंपर , वाळूसह सुमारे लाखो रुपयांचा महसूल जप्त केला.
महसूल विभागाच्या याधडक कारवाई मुळे अवैध्यरित्या वाळू वाहतूक करणार्या वाळू व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.  यापुढे ही धडक कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी दिली.
याबाबबतची अधिक माहिती अशी, मागील काही दिवसांपासून खटाव तालुक्यातून कराड,सातारा, कडेगाव सांगली भागात मोठ्या प्रमाणात अवैध्यरित्या वाळू वाहतूक सुरू होती. तालुक्यातून सुरू असलेली अवैध्य वाळू वाहतूक रोखण्याचे आव्हान महसूल विभागासमोर उभे राहिले होते. शनिवारी रात्री आठ ते नऊच्या सुमारास प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सुशील बेल्लेकर, नायब तहसीलदार सुधाकर धाईंजे, प्रवीण घोरपडे, शंकर चाटे, अमोल मुसळे, चालक रायसिंग खाडेयांच्या पथकाने वडूज कराड रस्त्यावरील राजाचे कुर्ल येथे पाठलाग करून वाळूने भरलेले एकूण चार डंपर तसेच भुरकवडी हद्दीतील रान मळा येथे एक ट्रक असा वाळूसह सुमारे लाखांचा ऐवज जप्त केला.अचानक झालेल्या कारवाई मुळे वाळू सम्राटांचे धाबे दणाणले .सध्या सि.कुरोली, औंध,चौकीचा आंबा तसेच गोपूज ,पुसेसावळी मार्गे ही अवैध्य वाळू वाहतूक राजरोसपणे सुरू होती.महसूल विभागाने केलेल्या धडक कारवाई मुळे सर्वसामान्य जनतेतून समाधान व्यक्त केले जात असून या अवैध्य वाहतूकीचे समूळ उच्चाटन करावे अशी मागणी केली जात आहे. दरम्यान यामधील जप्त केलेली वाहने वडूज तहसील कार्यालयात लावण्यात आले आहेत.

रात्रभर तहसीलदार तळ ठोकून : राजाचे कुर्ल येथे कारवाई केल्यानंतर तहसीलदारांनी त्याच रात्री भुरकवडी गावच्या हद्दीत बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडला . दरम्यान पकडलेला ट्रक सुरू होत नसल्याने साहेबानी एकट्याने रात्र भर त्याच ठिकाणी तळ ठोकला होता. त्यांच्या या कारवाईची चर्चा दिवसभर  सुरू होती.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular