भिमा कोरेगाव दंगलीच्या सुत्रधारांना त्वरीत अटक करा ; दादासाहेब ओव्हाळ यांची पत्रकार परिषदेत मागणी

सातारा : भिमा कोरेगाव येथे दि. 1 जानेवारी रोजी झालेल्या दंगल ही नियोजनबध्द घडवून आणली होती. सदर दंगलीमध्ये लाखो लोक येतात याची कल्पना असूनसुध्दा मोठी आराजकता माजवण्याच्या हेतूने मनोहर भिडे व मिलींद एकबोटे यांनी ही दंगल घडवून आणली होती. त्यांच्यावर गुन्हा दाखल होवूनही त्यांना अटक होते नाही उलट या लोकांना पोलीस सरंक्षण दिले जाते यामुळे शासनाची भूमिका संशयास्पद वाटते याचा आम्ही तीव्र निषेध करतो व संबंधितांना त्वरी अटक करावी अन्यथा तिव्र आंदोलन उभारले जाईल, अशी माहिती रिपाईच्या जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
1 जानेवारी 1818 साली एतिहासिक भिमा कोरेगाव विजयी स्तभाला 200 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अनेक आंबेडकर अनुयायी अभिवादन करण्यासाठी एकत्रित आले होते. यावेळी काही जातीयवादी प्रवृत्तीने निष्पाप आंबेडकर अनुयांयांवर हल्ला घडवून आणला. बहुजन समाजाच्या मालकीच्या वाहनांची तोडफोड व्हावी, अशी व्ह्यूव रचना आखून आपला हेतू साध्य केला. यामध्ये काहींचा बळी गेला हे दुदैव आहे.
दंगल खोरांना मानवतावादी दृष्टीकोन नसतो. तर मनुवादी विचाराने ते ग्रासलेले असतात. त्यामुळे राज्यात कायद्याचे राज्य नाही हे दाखवून देण्यासाठी सर्व आंबेडकर अनुयायांनी व विविध संघटनांनी उत्स्फुर्तपणे बंद पुकारला. या बंदला जाणीवपूर्वक गालबोट लावण्यासाठी खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले हे 35 टक्के मराठा रस्त्यावर उतरले तर काय होईल असे बोलत आहे, पण नुकताच सकल मराठी क्राती मोर्चा मुंबईमध्ये धडकला त्यावेळी एक ही दगड पडला नाही.
कारण या मोर्चामध्ये उदयनराजे नव्हते असा कोणी इतिहास लिहीला तर त्याला काय उत्तर द्यावे याचे त्यांनी आत्मचिंतन करावे.