म्हासुर्णेत हायमाॕस्ट पोलचे उद्घाटन

म्हासुर्णे : (प्रतिनिधी तुषार माने )म्हासुर्णे ता.खटाव येथील ग्रामपंचायतीच्या वतीने वार्ड क्रमांक ४ मध्ये डायमाॕस्ट पोलचे उद्धाटन म्हासुर्णे ग्रामपंचायत सदस्य सिंकदर मुल्ला,समाधान थोरात,नवतरुण मंडळाचे अध्यक्ष संदिप माने यांच्या हस्ते झाले.
म्हासुर्णे येथे वार्ड क्रमांक ४ मध्ये नवतरुण मंडळ आहे हे मंडळ नवरात्रोत्सव अतिशय मोठ्या उत्साहात साजरा करते रात्री दांडीया खेळण्यासाठी गावातील महिला या ठिकाणी एकत्र येतात.सुरक्षेच्या दृष्टीने म्हणुन नवतरुण मंडळातील काही कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतीकडे हायमाॉस्ट पोलची मागणी केली ही मागणीचा पाठपुरावा करुन तत्पर हायमाॕस्ट पोल बसवला या उद्धाटन प्रसंगी सरपंच सचिन माने,उपसरपंच सुहास माने,ग्रामपंचायत सदस्य तुषार माने,आबा यमगर,विठ्ठल माने,गुलाब वायदंडे,महेश पवार,संगिता गुरव,नलिनी कुलकर्णी,तृप्ती थोरात,वंदना माने,सिताबाई माने,दिव्या पवार,कुसुम माने,विठ्ल माने,विठ्ठल यमगर व म्हासुर्णे ग्रामस्थ व नवतरुण मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

( छाया : तुषार माने)