म्हासुर्णे येथे सोसायटीच्या नवीन इमारतीचे उदघाटन ; म्हासुर्णे विविध कार्यकारी सोसायटी व जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या शाखेचे स्थलांतर कार्यक्रम संपन्न

 

म्हासुर्णे – कार्यक्रमात बोलताना आमदार बाळासाहेब पाटील व इतर (छाया- तुषार माने म्हासुर्णे)
म्हासुर्णे – सोसायटीने बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलनाचे उद्घाटन करताना मान्यंवर (छाया- तुषार माने म्हासुर्णे)

म्हासुर्णे (प्रतिनिधी तुषार माने म्हासुर्णे): दुष्काळी भागातील सोसायटीने शंभर टक्के वसुल करुन आपल्या नफ्यातुन सोसायटीची इमारत उभी केली आणि त्या इमारतीत जिल्हा बॅक घेवुन सोसायटीच्या उत्पन्नात वाढ केली हि बाब अभिमानास्पद असल्याचे मत सातारा बँकेचे उपाध्यक्ष सुनिल माने यांनी मांडले,

ते म्हासुर्णे ता.खटाव येथे आयोजित केलेल्या सोसायटीच्या नवीन इमारतीच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात बोलत होते,
यावेळी आ.बाळासाहेब पाटील,माजी आ.प्रभाकर घार्गे,राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष व सातारा बँकेचे उपाध्यक्ष सुनिल माने,सांगली जि.प.माजी उपाध्यक्ष दत्तात्रय सुर्यवंशी,जि.प.सदस्य प्रदिप विधाते,जिल्हा बॅक संचालक अर्जुनराव खाडे,मार्केट समिती माजी सी.एम.पाटील ,मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे साहेब ,उमेश उबरदंडसाहेब,सुबोध अभ्यंकरसाहेब, माजी समाजकल्याण सभापती मानसिंग माळवे, प.स.सदस्या जयश्री कदम, पं.स.सदस्या रेखा घार्गे,चंद्रकांत पाटील,धनाजी पावशे,शिक्षण सल्लागार मंडळाचे चेअरमन महादेव माने,सेक्रेटरी राजाराम माने,सुहास माने,ग्रामपंचायत सदस्य तुषार माने,गुलाब वायदंडे,विठ्ठल माने,सिकंदर मुल्ला,आबा यमगर,समाधान थोरात,दतात्रय रुद्रुके, विभागिय विकास अधिकारी उध्दव देशमुख आदींची उपस्थिती होती,
आ.बाळासाहेब पाटील म्हणाले की सोसायटीच्या जागेसाठी आलेल्या अडचणी दुर करुन ही इमारत उभी राहीली आहे
त्यामुळे गावाच्या विकासास भर पडली आहे.सोसायटीने धाडस केले ४० लाख कर्ज घेवुन त्यामध्ये हे व्यापारी संकुलन उभे केले. गावाच्या वैभवात भर घालण्यासारखे सोसाटीने काम केले.सोसायटीची वसुली सुध्दा १००% आहे चार गावची सोसायटी असुन सुध्दा आपण चांगल्या प्रकारचा समन्वय या ठिकाणी ठेवला आहे.जुन्या आणि नविन संचालकांचा समन्वय असल्यामुळे चांगल्या प्रकारचे काम झाले. सोसायटी अॉफीस चांगल्या प्रकारे असल्याचे त्यानी आवर्जुन सांगितले जिल्हा बँकेत लॉकरची गरज का आहे हे ग्रामस्थांना सांगितले व लॉकर उपलब्ध होण्यासाठी जिल्हा बँक अधिकारी यांना सुचना केल्या.त्याचप्रमाणे म्हासुर्णे सोसायटीने रेशिनिंग दुकान सुध्दा बरेच दिवसापासुन चांगल्या पध्दतीने चालवुन आपल्या सोसायटीत रेशनिंग दुकानाच्या रुपाने उत्पन्नात भर घातली आहे. असे मत मांडले,
तद्नंतर माजी.आ. प्रभाकर घार्गे म्हणाले की सातारा जिल्हा बॅकेच्या माध्यमातुन म्हासुर्णे सोसायटीसाठी लागेल ती मदत केली आणि त्याचे फलित म्हणुन आज ही इमारतआपल्या सेवेसाठी उभी राहिली आहे,संस्था सक्षम करायच्या असतील तर या दुष्काळा भागातील लोकांना तारण पाहुन कर्ज वाटप वाढवले पाहिजे म्हणजे संस्था सक्षम होण्यास मदत होईल त्यामुळे खटाव तालुक्यातील ७ कोटी वरील वाटप आता २४० कोटीवर गेले आहे.अभिमान वाटतो खटाव तालुका हा इतर तालुक्याच्या तुलनेने वसुली मध्ये पुढे आहे
खटाव तालुक्यातील १०४ सोसायटीची बॅकपातळीवरील शंभर टक्के वसुली आहे, त्यामुळे सोसायटी सक्षमपणे
उभ्या असल्याचे मत मांडले,
दरम्यान आजी माझी सर्व म्हासुर्णे सोसायटी चेअरमन,व्हा.चेअरमन,संचालक यांचा सत्कार आमदार बाळासाहेब पाटील,माजी आमदार प्रभाकर घार्गे,उपाध्यक्ष सुनिल माने यांच्या हस्ते व इतर मान्यंवरांच्या उपस्थितत झाला.
या कार्यक्रमास चेअरमन राजाराम माने,व्हा.चेअरमन विलास शिंदे,दादासो कदम,एम.पी.माने साहेब,भरत माने,अधिक माने,दिपक सावंत,महादेव पवार,विलास माने ,आण्णासो माने,नंदकुमार माने,गोरख माने,नाथा यमगर,रुपेश फाळके,दादाहय्यात सय्यद,शांताबाई निकम,यशोदाबाई सुर्यवंशी,सोसायटी सचिव उत्तम सुर्यवंशी व म्हासुर्णे परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ,
कार्यकर्ते, म्हासुर्णे सोसायटीचे सभासद आदींची
उपस्थिती होती ,
प्रास्ताविक राजाराम माने यांनी केले,तर आभार पांडुरंग माने यांनी मानले.