सातार्‍यात भारतीय समाजवादी रिपब्लिकन पक्षाचे चक्री उपोषणाला वाढता पाठींबा

सातारा : देशातील अनेक वंचित समाज मूलभूत सुविधा पासून दूर आहेत. तर दुसर्‍या बाजूला श्रीमंत वर्गाला खुश ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लाभ मिळत नाही तो मिळाला पाहिजे यासाठी भारतीय समाजवादी रिपब्लिकन पक्षाचे नेते व राष्ट्रीय अध्यक्ष लक्ष्मण माने व उपाध्यक्ष मच्छिंद्रनाथ जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सातारा जिल्हा धिकारी कार्यलायासमोर चक्री उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनाला वाढता पाठींबा मिळत आहे.
शासकीय नोकर भरती प्रक्रिया सुरू करा, सध्याच्या सेवकांना भविष्यात सेवानिवृत्ती वेतन मिळावे, अनुसूचित जमाती  मध्ये धनगर, वंजारी व मूळच्या भटके विमुक्त जाती-जमातीचा समावेश करण्यात यावा, रिक्त पदे त्वरित भरावीत, खाजगी क्षेत्रात राखीव जागा उपलब्ध करून दयाव्यात,ठेकेदारी पद्ध्तीने कामगारांचे होणारे शोषण थांबवून त्यांना सेवेत कायम ठेवणे, सहकारी संस्था यांना आर्थिक मदत करणे,त्यांना पुन्हा सेवानिवृत्ती वेतनाचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे अशा प्रकारच्या विविध मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला विविध संघटनेने जाहीर पाठींबा देवून सहभाग घेतला आहे. आतापर्यंत रिपब्लिकन ब्लू फॉर्सचे मदन खकाळ, क्रांती थिटर्सचे अमर गायकवाड, प्रकाश फरांदे, वर्षा देशपांडे,कम्युनिस्ट पक्षाचे कॉ वसंत नलावडे, दगडू सस्ते, भारिप बहुजनचे चंद्रकांत खंडाईत, हरिदास जाधव, रमेश वैदू, खिस्ती समाजचे जोसेफ फर्नांडिस(नगर)मुस्लिम समाजातील आयेशा व फारुख पटनी, बामसेफचे नितनवरे,मातंग नेते अंकुश भिगारदिवे, ओ बी सी संघटनेचे नेताजी गुरव ,मल्हारी जाधव,बाळासाहेब माने, निशा जावळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.