दुसरा कसोटी सामना अनिर्णित

जमैक : पाऊस आणि  रोस्टन चेसच्या शतकाच्या जोरावर वेस्ट इंडिजने जमैका कसोटी अनिर्णीत राखण्यात यश मिळवलं.  या सामन्यात भारताला विजयासाठी अखेरच्या दिवशी सहा विकेट्सची आवश्यकता होती. पण 4 बाद 48 धावांवरुन खेळण्यास सुरुवात करण्याऱ्या विंडीजच्या खेळाडूंनी पाचव्या दिवशी अगदी चांगली फलंदाजी केली. विंडीजच्या रोस्टन चेसने 269 चेंडूंत पंधरा चौकार आणि एका षटकारासह नाबाद 137 धावांची खेळी केली. हे त्याचे कारकीर्दीतले पहिललेच शतक ठरले. याच शतकाच्या जोरावर विंडीज ला हा सामना अनिर्णित करण्यात यश आले.

पावसामुळे या कसोटीच्या चौथ्या दिवशी केवळ 15.5 षटकांचाच खेळ झाला होता. भारत आणि वेस्ट इंडिज संघांमधला तिसरा सामना 9 ऑगस्टला सेंट ल्युसियामध्ये खेळवला जाणार आहे.