भारतीय गोलंदाजीपुढे वेस्टइंडिज संघ गारद

किंगस्टन : वेस्टइंडिज विरूद्धच्या दुस-या कसोटी सामन्यात भारताच्या गोलंदाजीपुढे विंडिज संघ पुन्हा गारद झाला. आश्विनच्या फिरकीपुढे विंडिज संघाचा पहिला डाव 196 धावांवर आटोपला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने दिवसअखेर 1 गडी बाद 126 धावा केल्या. लोकेश राहूल 75 तर चेतेश्वर पुजारा 18 धावांवर खेळत आहेत.शिखर धवनने 26 धावा केल्या .  नाणेफेक जिंकुन विंडिज संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. अश्विनने 5, तर इशांत शर्मा आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी 2 गडी बाद केले