सातारा जिल्ह्यात भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा

साताराः 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान देशाला अर्पण केले. दुदैवाने याच दिवशी 10 वर्षापुर्वी अतिरेक्यांनी मुंबईवर हल्ला केला. त्या हल्यातील अजमल कसाब या अतिरेक्याला सातारचे सुपूत्र शहिद तुकाराम ओंबळे यांनी जिवंत पकडले. आणि भारतीयांचे रक्षण केले. एकिकडे भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर दुसर्‍या बाजूला शहिदवीराला अभिवादन करण्यात आले. संपूर्ण सातारा जिल्ह्यात भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करताना देशप्रेमाचे धडेही गिरवण्यात आले.
घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण व शालेय शिक्षण सातार्‍यात झाले आहे. छत्रपती शिवरायांची राजधानी म्हणून जगभरात सातारा प्रसिध्द आहे. त्याचबरोबर 26 नोव्हेबर रोजी झालेल्या अतिरेकी हल्यात केडंबे ता. जावली येथील मुंबई पोलीस दलातील शहिद तुकाराम ओंबळे यांनी गिरगाव चौकात कसाब याला जिवंत पकडले. स्वत:चे प्राण गेले तरी त्यांनी कसाबला मारलेली मिठी ही सातारच्या बहाद्दुरीची निशाण ठरली आहे. त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच भारताच्या संविधनाची प्रत व महाडचा मुक्ती संग्राम या अंकाचे वितरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था(बार्टी) चे अधिकारी, ज्येष्ठ पत्रकार शिवाजी राऊत, अजित जगताप, डॅनियल खुडे, चंद्राकांत खंडाईत, दादासाहेब ओव्हाळ यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. आंबेकडर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर सातारवासीयांना तसेच सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांना संविधनाची प्रत व महाडचे मुक्ती संग्राम हा अंक भेट देण्यात आला. पोलीस अधिक्षक ज्या खुर्चीवर विराजमान झाले, त्याच खुर्चीवर शहिद अशोक कामटे कारभार पहात होते. ही अभिमानस्पद बाब ठरली आहे.
स्वाभीमानी रामोशी महासंघ महाराष्ट्र यांच्यावतीने राज्य अध्यक्ष सौ. प्रिया नाईक यांनी सुध्दा भारतीय संविधान व अभिवादन दिन सातारा शहरात साजरा केला. तसेच किसनवीर सह. साखर कारखाना येथे मेढा पोलीस ठाण्याचे पो. नि. जीवन माने व अध्यक्ष मदनदादा भोसले, पुसेगाव पोलीस ठाणे येथे आयपीएस अधिकारी समीर शेख, प्रांतधिकारी दादासाहेब कांबळे, स. पो. नि. विश्‍वजीत घोडके आणि केंडबे ता. जावली याठिकाणी सरपंच वैशाली जंगम, उपरसरपंच प्रकाश ओंबळे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य एकनाथ ओंबळे यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. या शहिद दिनानिमित्त भिरडाचीवाडी येथील शहिद स्मृती दिनानिमित्त अन्नादान करण्यात आले. सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी शहिद वीरांना अभिवादन करून त्यांच्या स्मृती जतन करण्यात आल्या.