इंग्लंड विरुद्धच्या टी – 20 आणि एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय टीमची घोषणा

मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या तीन वनडे सीरिज आणि टी-20 सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. महेंद्रसिंग धोनीनं वनडे आणि टी 20च्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर विराट कोहलीकडे टीमचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे.

इंग्लंडविरुद्धच्या या दोन्ही सीरिजसाठी युवराज सिंगच टीममध्ये पुनरागमन झालं आहे. तर जखमी झालेला शिखर धवन आणि अजिंक्य रहाणेचाही टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.

वनडे टीम –

विराट कोहली (कॅप्टन), एमएस धोनी, के.एल.राहुल, शिखर धवन, मनिष पांडे, केदार जाधव, युवराज सिंग, अजिंक्य रहाणे, हार्दिक पांड्या, आर.अश्विन, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव

T-20 संघ

विराट कोहली (कॅप्टन), एमएस धोनी, के.एल.राहुल, मनदीप सिंग, सुरेश रैना, मनिष पांडे, युवराज सिंग, हार्दिक पांड्या, आर.अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, आशिष नेहरा, रिषभ पंत, चहल