जागतिक एड्स दिनानिमित्त रॅलीद्वारे जनजागृती

सातारा :  1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो.  या दिनानिमित्त क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे एड्स जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलिला मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मार्गस्त केले.
यावेळी जिल्हा सत्र न्यायाधीश बी.यु. देबडवार, तदर्क जिल्हा न्यायाधीश श्रीमती पी.व्ही. घुले, जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष नरळे,  सह दिवाणी न्यायाधीश पी.आय. सूर्यवंशी, सह दिवाणी न्यायाधीश एस.बी. पाटील,  प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. उज्वला माने, कराडचे गटविकास अधिकारी अविनाश फडतरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी हेमंत भोसले, डॉ. सुधीर बक्षी, डॉ. किशोर संकपाळ आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा सत्र न्यायाधीश बी.यु. देबडवार म्हणाले, लग्नापूर्वी एच.आय.व्ही. चाचणी ही सर्वांनी केली पाहिजे. जेणेकरुन एच.आय.व्ही. चा संसर्ग असेल तर आपल्या होणार्‍या जोडीदाराला तो होऊ नये. यावर्षीचे घोषवाक्य होऊया सारे एकसंघ, करुया एच.आय.व्ही. चा प्रतिबंध हे असून ज्या ज्या वेळी आपल्या देशावर कोणतीही बिकट परिस्थिती येते त्या त्या वेळी आपली जनता त्या संकटाचा सामना करण्यासाठी एकजुटीने उभी राहते. एच.आय.व्ही. च्या समुळ उच्चाटन करण्यासाठी आपण ठामपणे उभे राहिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले. यावेळी महाविद्यालयीन युवक, युवतींना एड्स विरोधी शपथ देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. उज्वला माने यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. सुधीर बक्षी यांनी केले. या कार्यक्रमास नर्सींग कॉलेजचे विद्यार्थी, विद्यार्थींनी, विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी-विद्यार्थींनी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.