जावळीतील महिलांनी दिल्या 70 हजार एकशे पंचेचाळीस पुरणपोळ्या

साताराःजावळी तालुका वारकरी संघाच्या आवाहनाला प्रतिसाद देत जावळीतील महिला भगिनींनी 70 हजार एकशे पंचेचाळीस पुरण पोळ्या भेट देऊन सत्कार केला. मेढा नगरीत संपन्न झालेल्या पंचवार्षिक पारायण सोहळ्याच्या काल्याच्या महाप्रसादाचा कार्यक्रम 4 जानेवारी 2019 रोजी संपन्न झाला. जावळी तालुका वारकरी संघाच्या आवाहनाला प्रतिसाद देत जावळी तालुक्यातील महिलांनी पहाटे 4 वाजले पासुन पुरण पोळ्या बनवुन सकाळी 8वाजले पासुन मेढा नगरीतील श्री तुकोबाराय नगर मधे कार्यक्रम स्थळी आणुन देण्यास सुरवात केली.
जावळी तालुका डोंगर दर्‍यांनी व्यापल्यामुळे तो अनेक विभांगामधे विस्तारला आहे. कोयना-सोळशी,वेण्णा दक्षिण, केळघर,मेढा,सायगाव,कुडाळ, करहर, डोंगरी विभाग मार्ली – मरडमुरे, म्हाते मुरे अशा विविध विभागातुन टोपल्या-घमेली भरून महिला भगिनी व त्यांच्या मदतीला ग्रामस्थ लगबगीने कार्यक्रमस्थळाकडे येत होती. प्रत्येक माय-भगिनींच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसडूंन वहात होता. गरीब-असो वा श्रीमंत प्रत्येक घरातुन माऊलींच्या चरणावर अर्पण झाला पुरण पोळीचा महानैवेद्य….! महिला भगिनी केवळ पुरण पोळ्या आणून थांबल्या नाहीत तर पुरूषांच्या बरोबरीने वाढप कामातही ऊतरल्या. अगदी आग्रहाने पोळ्या,दुध,तुप,कटाची आमटी वाढताना त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.अनेक महिलांना आपण माहेरातच आलो असल्यासारखे वाटत असल्याचे मनोगत अनेक महिलांनी बोलुन दाखवले कारण वाढप करणारा जावळीकर भाऊ अगदी महिला भगिनींना आग्रहाने वाढत होता.
आलेल्या पोळ्यांचा ढिग एवढा मोठा होता की तो संपने अशक्य होते यामुळेच महाप्रसाद घेवून परत जाणार्‍या प्रत्येक भाविकाला परणपोळ्या बांधुनही देण्यात आल्या. दुपारी 1 वाजता सुरू झालेला महाप्रसाद रात्री 8 वाजेपर्यंत सुरूच होता. जावळीकरांनी ठरवल तर कोणताही ईतिहास घडवू शकतात हे पुन्हा एकदा या अनोख्या उपक्रमाने अधोरेखीर झाले