जिहे-कठापूरप्रश्नी शिवसेनेला कॉग्रेस, राष्ट्रवादीची साथ ; पदयात्रेत शिवसेनेबरोबर दोन्ही काँग्रेसचा सहभाग 

पुसेगाव : जिहे-कठापूर उपसा सिंचन योजना, शेती मालाला हमीभाव व वाढती महागाई यासह विविध प्रश्नांविरोधात खटाव तालुका शिवसेनेच्यावतीने  मोळ ते वर्धनगड अशी पदयात्रा व वर्धनगड बोगदा येथे ठिय्या आंदोलनाचा आज सुरवाता झाली. शिवसेनेच्या या आंदोलनात कॉग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवल्याने आगामी काळात जिहे कठापुर प्रश्नी सर्व पक्षीय आवाज उठवून जिहे कठापूरचा प्रश्न निकालात काढण्याची रणनिती पाहायला मिळणार आहे. आज शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांनी पुसेगाव येथे आगामी संघर्षाचे रणशिंग फुंकले. याला दोन्हीही कॉग्रेसची साथ मिळाल्याने  शिवसैनिकांचा उत्साह वाढला
यावेळी प्रताप जाधव म्हणाले, जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेचे काम सुरु होऊन 22 वर्षे लोटली आहेत, तरीदेखील हे काम पुर्णत्वाकडे गेले नाही. अनेक नेतेमंडळींनी जिहे-कठापूर योजना पुर्णत्वाकडे नेणेसंबंधी आश्वासने दिली. परंतू कोणत्याही नेत्यांनी त्या आश्वासनांचा शब्द पाळला नाही. उरमोडी व धोम-बलकवडी उपसा सिंचन योजना मागून पुर्ण झाल्या आहेत. जिहे-कठापूर योजना पुर्ण करणेसंबंधीत राजकीय नेत्यांकडून जाणीवपुर्वक राजकारण केले जात आहे. खटाव तालुक्यातील भाजपच्या एका नेत्याने जिहे-कठापूरसाठी 800 कोटी निधी आणल्याचा जावई शोध लावला. संपूर्ण कोरेगाव मतदारसंघातील प्रमुख गावांमध्ये 800 कोटी मंजूर केल्याचे बॅनर झळकविले. अशी वस्तुस्थिती असताना योजनेचे काम सुरु करण्यास भाजपच्या नेत्यांना मुहुर्त सापडत नाही का ? असा सवाल उपस्थित करुन ते पुढे म्हणाले, जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेखाली खटाव व माण तालुक्यतिील 27500 हेक्टर लाभक्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे ही योजना पुर्णत्वाकडे जात नाही तोपर्यत खटाव तालुक्यातील शिवसैनिक स्वस्थ बसणार नाहीत. असा इशाराही त्यांनी दिला तर खटाव कॉग्रेसच्या वतीने तालुका अध्यक्ष डॉ सुरेश जाधव म्हणाले जिहे कठापूरचे पाणी गटाव तालूक्याचे हक्काचे पाणी असून त्यासाठी पक्षभेद बाजूला सारून जिहे कठापूर प्रश्नी शिवसेनेला साथ देण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी आहे असेही ते म्हणाले
तर राष्ट्रवादी खटाव तालुका अध्यक्ष बाळासाहेब जाधव म्हणाले आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या ज्वलंत प्रश्नची सोडवणूक करण्यासाठी राष्ट्रवादी कटीबध्द असून. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या विचारात जरी मतभेद असले तरी जिहे कठापूर प्रश्न राजकारण बाजुला सारून शिवसेनेच्या खांद्याला खांदा लाऊन लढण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत असे वचन बाळासाहेब जाधव याबनी दिले
यावेळी जि.प.सदस्य प्रदिप विधाते, पंचायत समिती सदस्य संतोष साळंखे, भटक्या विमुक्त सेलचे अशोक जाधव,माजी पंचायत समिती सदस्य मोहनराव जाधव, शिवसेना कोरेगाव विधानसभा प्रमुख भानुदास कोरडे आदिनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी विश्वस्त सुरेश जाधव,योगेश देशमुख,ज्ञानेश्वर जगताप, राजेंद्र कचरे आदि उपस्थित होते
यावेळी शिवसेना खटाव तालुकाप्रमुख दिनेश देवकर,महीला आघाडीच्या सत्वशिला जाधव,  महिपत डंगारे, रामदास जगदाळे, सुमित्रा शेडगे, आकाश जाधव, मुगटराव कदम, संजय घोरपडे, अस्लम शिकलगार, रामभाऊ लावंड, संजय नांगरे, मिथून ठोंबरे, साईश जाधव,नितीन सावंत, यशवंत जाधव यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 आमदारांचा आदेश
आमदार शशिकांत शिंदे यांनी  शिवसेनेच्या आंदोलनात आपल्या आणि कार्यकर्त्या नां सक्रिय सहभागी होण्याचा आदेश दिल्याने राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.