पत्रकार टि.पी. पाटील उर्फ (बाबा) यांचे निधन

 

पाटण:- बिबी ता. पाटण येथिल पत्रकार तुकाराम परशुराम पाटील- टि.पी. (बाबा) वय- ३९ यांचे शनिवारी पहाटे ह्रदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. पाटण तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व दै. तरुण भारत चे तालुका प्रतिनिधी म्हणुन त्यांनी काम केले.
पत्रकार टि.पी. पाटील यांना शनिवारी पहाटे पाटण येथील राहत्या घरी ह्रदय विकाराचा धक्का बसला म्हणून त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय पाटण येथे दाखल करण्यात आले. मात्र ततपुर्वीच त्यांचा म्य्रुत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पत्रकार तुकाराम पाटील- टि.पी. (बाबा) यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून व आपल्या लिखाणातून पाटण तालुक्यात वेगळा ठसा उमटविला होता. ते टि.पी. पाटील या नावानेच ओळखले जात होते. त्यांनी सामाजिक प्रश्नावर अनेक वेळा सडेतोड लिखाण करून सामाजिक प्रश्न सोडवण्यास ते यशस्वी झाले. राजकीय लिखाणात देखील त्यांनी सडेतोड लिखाण केले. गावच्या सामाजिक क्षेत्रात ते अग्रेसर होते. गावातील वाद-विवाद तंटा अथवा स्थानिक पातळीवरील संस्थांच्या निवडणूका एका विचाराने सर्वांना बरोबर घेऊन त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला. सतत हसत-मुख सर्वांच्या बरोबर खेळीमेळीत राहणारे टि.पी.पाटील यांचे शनिवारी पहाटे निधन झाल्याचे समजताच बिबी गावा बरोबर सामाजिक, राजकीय व पत्रकारिता क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांच्या निधनाची वार्ता समजताच माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी ग्रामीण रुग्णालय पाटण येथे येऊन अंत्यदर्शन घेतले पाटण तालुका पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकारी सदस्य यांनी टि.पी.यांच्या पार्थिवावर पुष्प अर्पण करून श्रध्दांजली वाहिली व अंत्यदर्शन घेतले. यावेळी पाटण तालुक्यातील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी टि.पी. यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यांच्या पश्यात आई, पत्नी, लहान मुलगा, मुलगी, भाऊ, बहिण असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी ९.३० वा. बिबी या गावी आहे.