कामथी येथील जवानावर अंत्यसंस्कार

सातारा : सातारा तालुक्यातील वेळे कामथी येथील जवान लक्ष्मण शिवाजी चव्हाण वय 34 यांचा ह्रदयविकाराने जम्मु-काश्मिर येथे कवायती दरम्यान मृत्यू झाला होता.
त्यांचे पार्थिव आज दि. 8 रोजी दुपारी वेळे कामथी येथे आणण्यात आले. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. लक्ष्मण चव्हाण यांचा मंगळवार सकाळी साडे सहाच्या दरम्यान परेडचा सराव करत असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.
लक्ष्मण चव्हाण हे 2004 मध्ये जम्मू काश्मीर येथे मेकॅनिक विभागात भरती झाले होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी संध्या व मुलगी श्रृतिका असा परिवार आहे. चव्हाण हे आपल्या कुटुंबियांसमवेत काश्मीर येथेच रहावयास होते. लक्ष्मण यांचे आई -वडिल व मोठा भाऊ यांचे छत्र यापूर्वीच हरपले आहे. ते कामथी गावात लखन या टोपन नावाने प्रसिद्ध होते. त्याचे अन्य एक बंधू गावात शेती करतात.
3 Attachments