अंगणवाडी कर्मचारी सभेचे कराडात जेलभरो

150 आंदोलनकर्त्यांना अटक; पोलिसांसह एकात्मिक बाल प्रकल्प अधिकार्‍यांना विविध मागण्यांचे निवेदन
कराड : हमारी युनियन हमारी ताकद, मानधन आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापचं, बेजट हटाव, अंगणवाडी बचाओ, अशा घोषणांनी कराड परिसर दणाणून सोडत हिंदू मजदूर सभा संलग्न महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी सभेच्या कराड तालुका शाखेच्यावतीने कराड येथे तालुक्यातील अंगणवाडी सेविका-मदतनीस यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी भव्य मोर्चा काढून जेलभरो आंदोलन करण्यात आले.
या मोर्चात कराड तालुक्यातील सुमारे 150 अंगणवाडी महिला सहभागी झाल्या होत्या. मोर्चाचे नेतृत्व कर्मचारी सभेच्या तालुकाध्यक्ष सौ. नलिनी मस्के, उपाध्यक्ष सुकेशनी गाडे, कार्याध्यक्षा संगीता गुरव यांनी केले. हा मोर्चा येथील यशवंतराव चव्हाण स्मृतीसदनाबाहेरील रस्त्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपिका ज्वौजाळ यांनी आडविला. पोलिसांनी आंदोलनकर्त्या महिलांना अटक केली. पोलीस व्हॅनमधून आंदोलनकर्त्यांना महिलांना काही काळासाठी कराड शहर पोलीस ठाण्यात स्थानबध्द करण्यात आले. त्यांची नावे व अन्य माहिती लिहून घेऊन त्यांना सोडून देण्यात आले.
यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, एकात्मिक बाल विकासचे प्रकल्प अधिकारी यांना निवेदन दिले.
या निवेदनातील माहिती अशी, अच्छे दिन आयेंगाचा नारा देत देशात भाजप सरकार सत्ते आले. पतप्रधान मन की बातची जाहिरात करतात पण त्यांना जन की बात कळत नाही. त्यांच्या उद्योगपती धार्जिण्या धोरणांमुळे सर्व सामान्य श्रमिक वर्ग उद्वस्त झाला आहे. सर्व प्रकारच्या अनियमित कर्मचार्‍यांच्या सेवा नियमित करा. अंगणवाडी कर्मर्‍यांना सरकारी नोकर माना, मानधनाऐवजी वेतन द्या. भाऊबीजेएवजी बोनस द्या, अंगणवाडी कर्मचार्‍यांना सरकारी नोकर मानेपर्यंत अंतरीय लाभ म्हणून दरमहा किमान 18 हजार वेतन द्या, कामगार विमा योजना यासारख्या सामाजिक सुरक्षा योजना द्या, अंगणवाइयांचे खाजगीकरण होता कामा नये, सरकारने 20 सप्टेंबर 2018 रोजी अंगणवाडी कर्मचा-यांसाठी जाहीर केलेली मानधनवाढ फरकासह ताबडतोब द्या, अंगणवाडी कर्मचार्‍यांना सेवानिवृत्ती लाभ निवृत्तीचे दिवशीच मिळाले पाहीजेत, निवृत्ती लाभाची पेंडीग प्रकरणे तातडीने पूर्ण करा, सेवा निवृतीलाभाची एक लाख एवेजी 3 लाख रुपये करा, अन्यथा दरमहा 5 हजार रुपये पेन्शन द्यावी, अंगणवाड्साठी इमारती द्या, भाडोत्री इमारतीचे भाडे वाढवून द्या, टी.एच. आर.बंद करुन स्थानिक ताजा आहार देणेची व्यवस्था करा, वर्षाला 15 दिवस भरपगारी आजारपणाची रजा द्या, उन्हाळी सुट्टी सेविका, मदतनीस व मिनी सेविकांना एकत्रित उपभोगता आली पाहिजे व त्या काळात लाभार्थ्यांना कोरडा आहार देण्याचे आदेश काढा, ऑक्टोबर 2017 पासून अंगणवाडी भरती प्रक्रिया बंद आहे, ती तात्काळ सुरू करावी, आपत्याचे प्रमाणपत्र विना तारखेच घेतल्यामुळे ते ग्राह्य धरू नये.