हजारमाचीचे महिला मल्ल रणांगण कराडच्या कोमल देसाईने जिंकले

ओगलेवाडी : हजारमाची (ता. कराड) येथील महिलांच्या कुस्ती मैदानात काले (ता.कराड) येथील मल्ल कोमल देसाई हिने जामखेडची मल्ल माधुरी चौधरी हिच्यावर झोळी डावावर 20 मिनिटात मात करून उपस्थितीत जनसमुदायाच्या डोळयाचे पारने फेडले.
हजारमाची ग्रामपंचायत व रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया शाखेच्या वतीने महिलांच्या कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. हे कुस्ती मैदान पाहण्यासाठी महिलांची मोठी उपस्थिती होती. या वेळी सिमाताई आठवले, फलटणच्या सुनिता काकडे, साताराच्या जयमाला साठे, शिलाताई गांगुरडे, जयवंत वीरकायदे, उद्योगपती पै.अतुल पवार, हजारमाची ग्रामपंचायतीच्या सरपंच, प्रतिभाताई लिमकर उपस्थितीत होत्या. या उपस्थितांच्या हस्ते आखाडयाचे पुजन करण्यात आले. या कुस्ती मैदानात जवळपास 40 महिला मल्लांनी सहभाग नोंदवला होता.
हजारमाची (ता.कराड) येथिल महिलांच्या निकाली कुस्ती मैदानात महाराष्ट्र चॅम्पीयन मल्ल कोमल देसाई (काले ता. कराड) व जामखेडच्या मल्ल माधुरी भोसले यांच्यात अटितटीचा सामाना झाला. या कुस्तीचे सर्वांनाच आकर्षन लागुन राहिले होते. त्यात मल्ल कोमल देसाई हिने 20 मिनिटात मल्ल माधुरी भोसलेवर झोळी डावांने मात करून कराड तालुक्याचे नाव उंचावले. तसेच कोल्हापुर कोडोलीची मल्ल संस्कृती पाटील हिने इस्लामपुरची मल्ल उज्वला साळुंखे हिच्यावर धिस्सा डावावर मात केली. जामखेडच्या मल्ल शिवानी भोसले विरूध्द येळगुडच्या मल्ल प्रज्ञा पांगरे यांच्यात लढत झाली. त्यात पांगरेंनी मल्ल भोसलेवर घुटना डावावर बाजी मारली.
मालखेडच्या मल्ल सौरागिनी माने हिने येळगुडच्या मल्ल वैष्णवी आहेस्कर, हिच्यावर विजय संपादन केला. अहमदनगरची आंतरराष्ट्रीय मल्ल बाली लोखंडे व इचलकरंजीची मल्ल दुर्गा कोरवी यांच्यात अटीतटीचा सामाना झाला. त्यात बाला लोखंडे हिने बाजी मारली. शिराळयाच्या मल्ल संजना डिसले व आर्वीच्या मल्ल स्मृती येवले यांची कुस्ती बरोबरीत सुटली कोळेवाडीच्या मल्ल भाग्यश्री वास्के व म्हासोलीच्या मल्ल शरयु शेवाळे यांच्यात सामना झाला. त्यात वास्के विजयी झाल्या तर मल्ल अश्‍विनी यादव व मल्ल वैष्णवी कदम यांच्यातील कुस्ती सोडविण्यात आली. या कुस्ती मैदानाचे पंच म्हणुन अतुल पवार यांनी काम पाहिले.