मल्हारपेठ येथील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

मल्हारपेठ: येथील भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशन च्या मान्यतेने समर्थ क्रीडा मंडळ व ग्रामस्थ मल्हारपेठ यांनी या दोन दिवसीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेसाठी सुमारे 35 संघांनी सहभाग घेतला. 50 किलो खालील व 65 किलोखालील कबड्डी स्पर्धांचे सर्वच सामने रंगतदार चुरशीच्या लढतीनी क्रीडाशौकिनांच्या डोळ्याचे पारणे फेडले.
50 किलोखालील गटात हातकणंगलेच्या मोती स्पोर्टस ने प्रथम क्रमांक पटकावला.कराडच्या लिबर्टी मजदूर संघास व्दितीय, सदाशिवगडच्या शिवशक्ती संघास तृतीय व कवठेपीरान संघास चतुर्थ क्रमांक मिळाला. उत्कृष्ट पकड पटूचा मान हातकणंगलेच्या सुरज मुल्ला ला मिळाला. उत्कृष्ठ चढाईपटू चा मान कवठे पीरान च्या महेश चाळके याला मिळाला.
मोठ्या गटात सदाशिव गडच्या शिवशक्ती संघास प्रथम क्रमांक, पोफळी च्या वैशाली स्पोर्टस संघास द्वितीय व विहे च्या मातृछाया संघास तृतीय तसेच कराड च्या लिबर्टी संघास चतुर्थ क्रमांक मिळाला कवठे पीरान च्या हिंदकेसरी संघास आदर्श संघाचे बक्षीस मिळाले.
संकेत उमासे व शुभम पवार यांना उत्कृष्ठ चढाई व उत्कृष्ठ पकडचा मान मिळाला. या अटीतटीच्या कबड्डी स्पर्धेसाठी पंच म्हणून राष्ट्रीय पंच रमेश देशमुख, राज्य पंच शशिकांत यादव, तानाजी देसाई, अक्षय साळुंखे, उमेश भोसले, अक्षय देसाई, सिद्धार्थ जाधव, अविनाश धमाळ व प्रमुख संयोजक म्हणून वेंकटराव चव्हाण तात्या यांनी काम पाहिले.
मल्हारपेठच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी भव्यदिव्य अशी गॅलरीही उभारण्यात आली होती. तमाम क्रीडाशौकिनांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेसाठी भव्यदिव्य अशी बक्षिसे संजय चव्हाण, प्रकाश पाटील, प्रा. एकनाथ चव्हाण, रंगराव कदम, डॉ. उदय वणारसे, डॉ. जी एस कांबळे, निनाई पतसंस्था शंकरराव कदम, अशोक मायने, अर्जुन टकले, अनिल वायदंडे, समीर कदम, अवधूत कांबळे, नमन ज्वेलर्स, समर्थ क्रीडा मंडळ मल्हारपेठ या बक्षीस दात्यांनच्या हस्ते देण्यात आली.
अशोक कदम, सुभाष पानस्कर यांनी समालोचन केले. बी.एल. पानस्कर, शंकर शेडगे, आबासाहेब वाघ, डी के पवार, श्रीकांत पालसंडे, संपतराव देसाई, संजय जैन, बबलू भिसे, विनायक चव्हाण, हर्षद पवार, सचिन चव्हाण, रोहित कदम, शेखर पानस्कर, किशोर जैन तसेच समर्थ क्रीडा मंडळचे सर्व पदाधिकारी संचालक समस्त ग्रामस्थांनी या स्पर्धा यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.
दोन दिवस ही मल्हारपेठ ची समर्थ क्रीडानगरी क्रीडाशौकिनांच्या गर्दीने फुलून गेली होती.