कराड एस.टी डेपोत सुरक्षितता पंधरवड्यास मोठ्या उत्साहात प्रारंभ

कराडः दि.11 जानेवारी 2019 रोजी महाराष्ट्र राज्य कराड एस.टी. डेपोमध्ये सुरक्षितता पंधरवडा साजरा होत आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.धनाजी देसाई उपस्थित होते. या प्रसंगी आगार व्यवस्थापक जे.डी.पाटील, स्थानिक प्रमुख कुलदीप डुबल, प्रा.सुभाष कर्नाळे, इ. मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन केले प्रास्ताविक व स्वागत एस.टी. अधिकारी श्री.घोरपडे यांनी केले. प्रा.धनाजी देसाई यांनी- सर्वांनी नियमांचे पालन करून सर्वांनी आपले आरोग्य सांभाळणे,वेगावर नियंत्रण ठेऊन वाहने चालवावीत, कायदा, हक्क व कर्तव्ये इ. बद्दल मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. प्रा.सुभाष कर्नाळे यांनी-नोकरीतील ताणतणाव, मानसिक संतुलन इ. बद्दल मार्गदर्शन केले. आगारप्रमुख जे.डी. पाटील यांनी- वाहन चालवताना घ्यावी लागणारी काळजी, शिस्त,नियम, कर्मचार्‍यांची कर्तव्ये,सेवा,प्रवाशांशी सलोख्याचे संबंध इ. बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले व सूचनाही दिल्या.
आभार एस.टी.अधिकारी किशोर जाधव यांनी मानले. तसेच सर्व अधिकारी वर्ग इतर वाहतूक नियंत्रक, चालक, वाहक व इतर सर्व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.