बसस्थानकामध्ये उभारण्यात आलेल्या नुतन इमारतीचे श्रेय आ.पृथ्वीराज चव्हाण यांनाच : ना. दिवाकर रावते

कराड : कराड येथील एस. टी. बसस्थानकात उभारण्यात आलेल्या नुतन इमारतीचे उद्घाटन माझ्या हस्ते होत असले तरी त्याचे सर्व श्रेय माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांनाच जाते. त्यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळात कोणत्याही प्रकारचे भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत. असे स्पष्ट मत शिवसेनेचे परिवहन मंत्री व महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यंानी व्यक्त करून ते म्हणाले माझ्या परिवहन मंत्री व महामंडळाच्या अध्यक्ष पदाच्या काळात मी अनेक जनहितार्थ निर्णय घेतले. यात अनेक योजनांचा समावेश आहे. राज्यातील जवळपास 98 बसस्थानकामधील विविध प्रकारची कामे हाती घेण्यात आल्याचे ही ते म्हणाले.
येथील एस. टी बसस्थानकाच्या आवारात उभारण्यात आलेल्या नुतन इमारतीचे उद्घाटन ना. दिवाकर रावते यांच्या हस्ते झालेत्या वेळी ते बोलत होते. यावेळी खा.श्री.छ. उदयनराजे भोसले, माजी राज्यपाल श्री निवास पाटील, माजीमुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. आनंदराव पाटील, आ. बाळासाहेब पाटील, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यंाच्यासह एस.टी. महामंडळाचे अधिकारी व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
ना. रावते पुढे म्हणाले मी ग्रामीण भागातील शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. जनतेच्या काय अपेक्षा असतात. याची मला जाण आहे. मी राज्याचा मंत्री झाल्यावर माझ्यावर एस. टी. महामंडळाची जबाबदारीहीटाकण्यातआली.प्रथम महामंडळाचा अभ्यास करून निर्णय घ्यायचे ठरवले पहिल्यांदा एस.टी.च्या उत्पन्नातील पैशाला हात न लावता इतर उत्पन्नातुन विकास करण्याचा निर्णय घेतला. राज्यातील बहुतांश बस स्थानकांची अवस्था बिकट असल्याचे पाहुण जवळपास 98 बसस्थानकातील समस्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य देण्याच्या दृष्टीने त्यांना अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत एस.टी.चा मोफत पास देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच एस.टी.च्या कर्मचार्‍यांचा विचार करून त्यांनाअनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्चही एस. टी महामंडळ उचलणार आहे. कर्मचार्‍यंाच्या आरोग्यासाठी महामंडळ खर्च करणार असल्याचे ही त्यांनी सांगुन व्यासपीठावर उपस्थित असलेल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा गुणगौरव केला व ना. रावते म्हणाले कराड एस. टी. बसस्थानकामधील न ुतन इमारतीचे काम महामंडळाच्या पैशातुन झालेले नाही. तर ते पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना सरकारच्या पैशातुन झाले आहे. त्यामुळे या नुतन बसस्थानकाचे श्रेय आ. चव्हाण यांना द्यावे लागेल तसेच त्यंाचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकालही विना भ्रष्टाचार गेल्याचे ही त्यांनी आपल्या भाषणात नमुद केले.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, येथील बसस्थानक पुर्णपणे जीर्ण झाले होते. हे लक्षात घेवुन मी राज्याचा मुख्यमंत्री असताना येथील बसस्थानकामधील नुतन इमारतीसाठी 11 कोटी रूपये मंजुर केलेत्यामुळेच अशी भव्य दिव्य वास्तु उभी राहिली आहे.
यावेळी खा. उदयनराजे भोसले, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. आनंदराव पाटील यंानी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास बहुसंख्य नागरीक उपस्थित होते.