अर्बन बँक घोटाळा प्रकरणाच्या चौका-चौकातील बोर्डने खळबळ ; सभासद ठेवीदारांच्या घबराट ; पोलीसांत तक्रार

कराड :- दि. कराड अर्बन को-ऑप. बँक लि. कराडच्या पूणे शाखेतील वाहन वितरण कर्ज प्रकरणाची वाच्यता सामाजिक कार्यकर्ते शरद देव व त्यांची कार्यकर्त्यांनी आज चौका-चौकात फ्लेक्स बोर्ड लाऊन केली. या बोर्डावरील आपले नम्र मा.आ.बाळासाहेब पांडुरंग पाटील असे नाव लिहले गेल्याने बँकींग, सामाजिक, राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली, तसेच बँकेच्या सभासद,ठेवीदारातही घबराटीचे वातावरण निर्माण झाले.
या बाबत अधिक माहिती अशी की, येथील दि. कराड अर्बन को-ऑप. बँक लि. कराडच्या पूणे येथील शाखेत वाहन वितरण कर्ज प्रकरणात लाखो रुपयांचा घोटाळा झाला असून, या घोटाळा प्रकरणी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच बँकेचे चेअरमन यांच्यासह तत्कालीन सर्व संचालक व अधिकार्‍यांवर पूणे येथील विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हे 2016 झाले आहेत. अशा आशयाच्या सविस्तर माहितीचे फ्लेक्स बोर्ड सामाजिक कार्यकर्ते शरद देव व त्यांच्या सहकार्‍यांच्या नावे व या नावाच्या बरोबरीनेच मा.आ. बाळासाहेब पांडुरंग पाटील हे नाव लिहिले गेल्याने आज शहरात बँकींग, सामाजिक, राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले.
दरम्यान हे वृत्त शहर व परिसरात सोशल मिडीयाच्या माध्यमातून पसरल्याने सभासद ठेवीदारांच्यात घबराट निर्माण झाली होती. अनेक सभासद, ठेवीदारांनी शहरातील बँकेच्या मुख्य शाखेसह इतर शाखेत गर्दी केली होती. काही सभासदांनी आपल्या ठेवी काढण्याचा प्रयत्न केला. ही परिस्थिती पाहून तेथील बँकेच्या अधिकार्‍यांनी काही सभासद ठेवीदारांना ठेवी परत केल्या तर, काहींना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
दि. कराड अर्बन को-ऑप. बँक लि. कराडचे कुटुंब प्रमुख सुभाष जोशी, बँकेचे चेअरमन सुभाष एरम तसेच कार्यकारी संचालक दिलीप गुरव व काही संचालक, कायदेशीर सल्लागार व अधिकारी यांनी शहर पोलीसांत धाव घेऊन संबंधित सामाजिक कार्यकर्ते शरद देव व त्यांच्या इतर कार्यकर्त्यांनी बँकेची बदनामी केल्याची तक्रार दाखल केली. यावरुन पोलीसांनी शरद देव व त्यांच्या इतर सहकार्‍यांच्यावर महाराष्ट्र विदद्रुपीकरण कायदा 2013 च्या कलम 3 अन्वये अदखलपात्र गुन्ेहा दाखल केला. दरम्यान नगरपालीकेने शहरात नगरपालीकेने शहरात फ्लेक्स बोर्ड लावण्याची परवानगी घेतली नाही. अशी तक्रार दाखल केल्याने पोलीसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला व वातावरणातील तणाव पाहून शहरातील फ्लेक्स बोर्ड पोलीसांनी जप्त केले.
दि. कराड अर्बन को-ऑप. बँक लि. कराडवर प्रतिक्रिया देताना शरद देव म्हणाले, आपण बँकेच्या पूणे शाखेत वाहन कर्ज वितरण प्रकरणी घडलेले सत्य लोकांसमोर व सभासद, ठेवीदारांच्या हितासाठी मांडण्याचा फ्लेक्स बोर्डच्या माध्यमाने प्रयत्न केला आहे.
अर्बन कुटुंब प्रमुख सुभाष जोशी म्हणाले, पूण्यातील एक ग्रहस्थ गोसावी नावाच्या या व्यक्तीने अनेक बँकांना खोटी कागदपत्रे देऊन गंडा घातला आहे. यामध्ये दि. कराड अर्बन बँकेचाही समावेश आहे. यागृहस्थावर कायदेशीर कारवाई केली आहे.
याविषयी बोलताना आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले, कराड अर्बन बँकेच्या बाबतीत शहरात लावलेल्या बोर्डवरील नावाशी माझा काहीही एक संबंध नाही. कायदेशीर बाबींची तपासणी करुन योग्य ती कारवाई करण्यात यावी.
पोलीस आणि कराड नगरपालीका यांचा दुटप्पीपणा उघड…..
कराड अर्बन बँकेच्या लागलेले फ्लेक्स बोर्डवर तात्काळ कारवाई पोलीस आणि नगरपालीका प्रशासनाने तात्काळ कारवाई केली गेली. परंतू जूलै 2017 मध्ये कराड नगरपरिषदेच्या नगराध्याक्षांच्या नावेच काही शुभेच्छा फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले होते. त्यावर मात्र आजतागायत न गुन्हा दाखल न कारवाई करण्यात आली.
लावण्यात आलेल्या फ्लेक्स बोर्ड मध्ये दैनिक लोकमंथन आणि दैनिक ग्रामोध्दार या वृत्तपत्रांनी वाचा फोडल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले होते.