कविता कचरे यांची जिल्हा महिला बालविकास तपासणी समितीवर निवड 

कराड: खळे (ता. पाटण) येथील सामाजिक कार्यकर्त्या कविता सतिश कचरे यांची सातारा जिल्हा महिला बालविकास तपासणी समितीवर निवड झाली असून याबाबतचे नियुक्तीपत्र जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी नुकतेच त्यांना दिले आहे.
कविता कचरे यांचे सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. सिताई महिला बचतगट व सिताई फौडेंशनच्या त्या अध्यक्षा  आहेत तसेच केंद्रीय भारतीय खाद्य निगमच्या त्या संचालिका म्हणून कार्यरत आहे. कविता कचरे यांना नेहरू युवा केंद्र ेमंडळाचा जिल्हास्तरीय उत्कृष्ट युवा मंडळ पुरस्कार, शासनाचा युवती पुरस्कार, पत्रकार संघटनेचा पुरस्कार यासह विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.
महिला अन्याय निवारण, महिला बचत गट या माध्यमातून तसेच शालेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्यासह गणवेश वाटप करून बालकांच्या  व  महिलांच्या  उन्नतीसाठी त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे.
त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन जिल्हाधिकरी श्‍वेता सिंघल यांनी त्यांची  सातारा जिल्हा महिला बालविकास तपासणी समितीवर  अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. जिल्हाधिकारी स्वताः या समिेतीच्या अध्यक्षा आहेत. कविता कचरे यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.