दासनवमी उत्सवानिमित्त समर्थ सदन येथे मान्यवरांची किर्तन, प्रवचन सेवा

दासबोध पारायणासह विविध भजन मंडळाचे सांप्रदायिक भजन
साताराः श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड संचलित येथील पंचपाळे हौदानजीकच्या श्री समर्थ सदन येथे गुरूवार दि. 1 फेब्रुवारी ते 9फेब्रुवारी 2018 दरम्यान दासनवमी उत्सव संपन्न होणार आहे. गेली 68 वर्षे निस्पृह भूमिकेतून समर्थ सेवेचे कार्य समर्थ सेवा मंडळ करीत आहे. माघ वद्य प्रतिपदा ते माघ वद्य नवमी या दासनवमी उत्सवात समर्थ रामदास स्वामींच्या विचारांचे जागरण व्हावे या हेतूने उत्सवकाळात दासबोध पारायण, प्रवचन, कीर्तन आणि भजन सेवा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दि .1 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारीदरम्यान दररोज सकाळी 8.30 ते 11 यावेळेत समर्थभक्त रविंद्रबुवा रामदासी यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक दासबोध पारायण होणार आहे. सायंकाळी 4 ते 6 यावेळेत दररोज विविध भजनी मंडळांचे सांप्रदायिक भजन होणार असून सायंकाळी 6 ते 8.30 यावेळेत सुप्रसिध्द कीर्तनकार व प्रवचनकार यांचेकडून कीर्तन व प्रवचन सेवा होणार आहे.
भजनसेवा व कीर्तनसेवेचा कार्यक्रम अनुक्रमे पुढीलप्रमाणे असून दि. 1 फेब्रुवारी रोजी व्यंकटपुरा भजनी मंडळ यांचे भजन व ह.भ.प.मकरंदबुवा करंबळकर यांचे किर्तन, शुक्रवार दि.2 फेब्रुवारी रोजी विष्णूकृपा भजनी मंडळ यांचे भजन व ह.भ.प.शरदबुवा तांबे यांचे किर्तन, शनिवार दि. 3 फेब्रुवारी रोजी वरद शारदा गणेश भजनी मंडळ यांचे भजन व वेदमुर्ती विवेकशास्त्री गोडबोले यांचे प्रवचन,रविवार दि. 4 फेब्रुवारी रोजी श्रीराम भजनी मंडळ यांचे भजन व ह.भ.प.मकरंदबुवा किर्लोस्कर यांचे किर्तन, सोमवार दि. 5 फेब्रुवारी रोजी चैतन्य भजनी मंडळ यांचे भजन व ह.भ.प.श्री गुरूनाथमहाराज कोटणीस यांचे प्रवचन, मंगळवार दि. 6 फेब्रुवारी रोजी वीरशैव लिंगायत महिला भजनी मंडळ यांचे भजन व ह.भ.प.गुरूनाथमहाराज कोटणीस यांचे प्रवचन, बुधवार दि. 7 फेब्रुवारी रोजी मीराभक्ती भजनी मंडळ यांचे भजन व ह.भ.प.सौ. नम्रता व्यास निमकर यांचे किर्तन, गुरूवार दि. 8 फेब्रुवारी रोजी मुक्ताई भजनी मंडळ यांचे भजन व ह.भ.प.प्रसादबुवा कुलकर्णी यांचे किर्तन, शुक्रवार दि. 9 फेब्रुवारी रोजी दासनवमी उत्सव समर्थसदन येथे विविध कार्यक्रमांनी साजरा होणार असून वरील सर्व कार्यक्रमात कीर्तनसाथीला संवादिनीची साथ बाळासाहेब चव्हाण हे करणार असून तबला साथ शांताराम दयाळ हे करणार आहेत.
वरील सर्व कार्यक्रमासाठी सातारकर नागरिकानी मोठया संख्येने सहभागी होवून दासनवमी उत्सवाचा आनंद द्विगुणीत करावा असे आवाहन समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह समर्थभक्त मारूतीबुवा रामदासी, कार्याध्यक्ष अ‍ॅड. डॉ. डी.व्ही.देशपांडे, कोषाध्यक्ष समर्थभक्त योगेशबुवा रामदासी व अध्यक्ष गुरूनाथमहाराज कोटनीस यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी सांस्कृतिक केंद्र संचालक मधुकर बाजी मो.9421216359 व समर्थ सदनचे व्यवस्थापक राजू कुलकर्णी 02162-284016 वर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.