किसन वीरच्या ऊस तोड यांत्रिकीकरण निर्णयाचे न्यु हॉलंड कंपनीकडून स्वागत

सातारा: ऊस तोड मजुरांच्या टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर पुढील गळित हंगामापासून पंचवीस केन हार्वेस्टर ऊस तोडणी यंत्रणेत दाखल करण्याच्या किसन वीर उद्योग समुहाच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. केन हार्वेस्टर घेऊ इच्छिणार्‍या शेतकर्‍यांबरोबरच अमेरिकेतील न्यु हॉलंड या केन हार्वेस्टर कंपनीच्या पदाधिकार्‍यांनीही कारखान्यास प्रत्यक्ष भेट देऊन व्यवस्थापनाच्या या निर्णयाचे स्वागत केले. अध्यक्ष मदनदादा भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर, केन हार्वेस्टर मालक व ऊस उत्पादक शेतकर्‍यांशीही त्यांनी चर्चा केली.
अमेरिकेतील न्यु हॉलंड कंपनीचे ग्लोबल मार्केटींग हेड क्रेग जॉर्जन्सन, रिजन हेड मोंझीओ मिकेली, कंपनीचे भारतातील विक्रीपश्‍चात प्रमुख रमेश कुमार, महाराष्ट्राचे वरिष्ठ मार्केटींग व्यवस्थापक नितीन पाटील यांनी कारखान्यास भेट देऊन कारखाना कार्यक्षेत्रात होणारे ऊस उत्पादन, सध्याची यांत्रिकी ऊस तोडणीची स्थिती, केन हार्वेस्टरने ऊस तोडीसाठी आणखी असणारा वाव याची माहिती घेतली.
संपुर्ण देशात केन हार्वेस्टरने सरासरी एक टक्का ऊस तोडला जात असताना किसन वीर उद्योग समुहाने दहा टक्क्यांपर्यंत घेतलेली आघाडी कौतुकास्पद असल्याचे नमुद करून कंपनीच्या पदाधिकार्‍यांनी कारखान्याच्या ऊस तोड यांत्रिकीकरणाच्या विस्तारास सहकार्य करू असे सांगितले. किसन वीर कारखान्याकडे सध्या कार्यरत असलेल्या केन हार्वेस्टरचे मालक आणि ऊस उत्पादक शेतकर्‍यांशीही त्यांनी चर्चा केली.
त्याचबरोबर कंपनीच्या पदाधिकार्‍यांनी भुईंज येथील लक्ष्मण शेडगे आणि ओझर्डे येथील विजयसिंह पिसाळ यांच्या शेतात केन हार्वेस्टरने सुरू असलेल्या ऊस तोड प्लॉटला भेट दिली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी पंचायत समिती सदस्य दिपक ननावरे, सतिश भोसले, भुईंजचे उपसरपंच प्रशांत जाधवराव, केशवराव पिसाळ, सुरेश चिकणे, भाऊसाहेब जाधव, मदन शिंदे, शेखर भोसले पाटील, रोहित जगदाळे, किरण शिंदे, कारखान्याचे इन्चार्ज अ‍ॅग्री मॅनेजर विठ्ठलराव कदम, प्रशांत भोसले, महादेव यादव, प्रदिप शेडगे, जयवंत शेडगे, प्रदिप शेडगे, सौरभ जमदाडे, उदय शिंदे, सागर मांढरे, तुषार शिंदे, संकेत भोसले, संजय पिसाळ, संतोष कदम, चंद्रकांत गुजर, अनिकेत चव्हाण, अरूण नवले, विशाल सावंत, शेतकरी उपस्थित होते.