राज्यस्तरीय बेस्ट डिस्टीलरी पुरस्काराने किसन वीर सन्मानित

भुईज : किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यास राज्यस्तरीय बेस्ट डिस्टीलरी पुरस्काराने पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिटयुमध्ये झालेल्या शानदार कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर, कार्यकारी संचालक अशोकराव जाधव, डिस्टीलरी मॅनेजर एस. वाय. महिंद, संचालक मंडळाने माजी केंद्रिय मंषी व व्हीएसआयचे अध्यक्ष शरदराव पवार, उपाध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, माजी उपमुख्यमंषी अजित पवार, खासदार विजयसिंह मोहिते पाटील, माजी सहकार मंषी हर्षवर्धन पाटील, माजी महसुल मंषी बाळासाहेब थोरात, माजी मंषी सतेज उर्फ बंटी पाटील आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत स्विकारला.
पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिटयुटकडून राज्यात कार्यरत असणा-या डिस्टीलरीमधुन विविध निकषांच्या आधारे एका डिस्टीलरीची बेस्ट डिस्टीलरी म्हणुन निवड केली जाते. आसवणीचा दैनंदिन व वार्षिक क्षमता वापर, उत्पादनाची गुणवत्ता व दर्जा, अर्थशास्ष, कार्यक्षमता, मोलॅसिसचा वापर, उतारा या सर्व निकषांवर किसन वीर साखर कारखाना गतहंगाम 2016-17 मध्ये आघाडीवर राहिला. कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांचे उत्.ष्ट मार्गदर्शन लाभल्यामुळे कारखान्याची या पुरस्कारासाठी निवड होवून किसन वीर परिवाराचा एका अर्थाने राज्यस्तरीय सन्मान झाला आहे. कारखान्याचा कारभार योग्यदिशेने व उत्तमरितीने सुरू असल्याची पावतीच या पुरस्काराच्यानिमित्ताने मिळाली असल्याची प्रतिक्रिया यावेळी मदनदादा भोसले यांनी व्यक्त करून अधिकारी व कर्मचा-यांच्या सांघिक कामकाजाचे कौतुक केले.
यावेळी कारखान्याचे संचालक सीए सी. व्ही. काळे, चंद्रकांत इंगवले, रतनसिंह शिंदे, विजय चव्हाण, राहुल घाडगे, सचिन साळुंखे, अरविंद कोरडे, प्रविण जगताप, प्रकाश पवार, नंदकुमार निकम, सयाजी पिसाळ, चंद्रसेन शिंदे, प्रविण जगताप, मधुकर शिंदे, नवनाथ केंजळे, मधुकर नलवडे, आशा फाळके, विजया साबळे, कार्यकारी संचालक अशोकराव जाधव, इन्चार्ज सेके्रटरी एन. एन. काळोखे, डिस्टीलरी मॅनेजर एस. वाय. महिंद, राज्यातील विविध साखर कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.