कोंडवे येथे खासदारांच्या हस्ते जलपूजन

सातारा : सातारा तालुकयातील कोंडवे या गावी सासंद आदर्श ग्राम योजनेतून उभारण्यात आलेल्या सिमेंट बंधार्‍यांत साठलेल्या पाण्याचे पूजन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या तसेच जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्या हस्ते करण्यात आले.

वनविभागातर्फे कोंडवे येथे 2 सिमेंट बंधारे बांधण्यात आले आहेत. या दोन्ही बंधार्‍यांमधून 61.45 टीसीएम पाणी साठा झाला आहे. त्याचबरोबर या गावामध्ये वनक्षेत्रसभोवार तार कुंपण, जुन्या दगड खाणीभोवती फेन्सिंग करणे तसेच आणखी एक बंधारा निर्मिती आदी कामे प्रस्तावित आहेत.

कोंडवेमधील झालेले सिमेंट बंधारे सध्या पाण्याने भरुन वाहत आहेत. आज या बंधार्‍यातील जलपुजन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या यांच्या तसेच जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्या हस्ते आज करण्यात आले.  या प्रसंगी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पी.बी. पाटील, उपवनसरंक्षक अनिल अंजनकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, जिल्हा परिषद सदस्य संदीप शिंदे, सरपंच संध्या गाडे, उपसरपंच अनिता चोरगे, डॉ. अविनाश पोळ  तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.