100 टीएमसी हून अधिक पाणीसाठा झाल्याने कोयना धरणातील शिवसागर जलाशयाचे आ. शंभूराज देसाई यांचे हस्ते ओटी भरण व जलपुजन

सातारा : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणा-या कोयना धरणातील शिवसागर जलाशयामध्ये मंगळवार दि. 14 ऑगस्ट, 2018 रोजी सकाळी 101.13 टीएमसी पाणीसाठा झाला असून 100 टीएमसी हून अधिक पाणीसाठा झालेल्या कोयना धरणातील शिवसागर जलाशयाचे  ओटीभरण व जलपुजन पाटण तालुक्याचे उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते सकाळी 10.10 वा. करण्यात आले.धरणातील शिवसागर जलाशयाचे  ओटीभरण व जलपुजन केल्यानंतर लगेचच धरणाच्या सहा वक्र दरवाज्यातून आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते एकूण 19041 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात आला.
यावेळी कोयना धरण बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंता वैशाली नारकर, कोयना धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील, याप्रसंगी उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार रामहरी भोसले, यांची प्रमुख उपस्थिती होती.एकूण 105 टीएमसी पाणीसाठा क्षमता असणा-या कोयना धरणात दि. 14 ऑगस्ट, 2018 रोजी सकाळी 101.13 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.
प्रतिवर्षी दि.15 ऑगस्टला 100 टीएमसी पाणीसाठयाचा टप्पा पुर्ण करणा-या कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयामध्ये दि.14 ऑगस्टला सकाळीच 100 टीएमसी पाणीसाठयाचा टप्पा ओलाडूंन 101.13 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी दि.30 ऑगस्ट रोजी तालुक्याचे लोकप्रतिनिधी उत्कृष्ट संसदपटु  आमदार शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते शिवसागर जलाशयातील या जलाशयाचे  ओटी भरण आणि जलपुजन करण्यात आले होते.यंदा 15 दिवस अगोदर परंपरेनुसार कोयना धरणाच्या भिंतीच्या आतील बाजूस आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते कोयना शिवसागर जलाशयाचे विधिवत पुजन करण्यात आले व त्यानंतर आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते व त्यांचे सोबत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जलाशयात खणनारळाची ओटी सोडून जलाशयाचे पुजन व ओटीभरण करण्यात आले.
 याप्रसंगी प्रतिक्रिया देताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, प्रतिवर्षी दि.15 ऑगस्टला 100 टीएमसी पाणीसाठयाचा टप्पा पुर्ण होतो गतवर्षीच 100 टीएमसी पाणीसाठा होणेकरीता दि.30 ऑगस्ट पर्यंत कालावधी लागला होता. यंदाच्या वर्षी चांगला पाऊस 15 दिवस अगोदर कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाने आज सकाळपर्यंत 100 हुन अधिक पाणीसाठयाचा टप्पा ओलांडून आतापर्यंत कोयना धरणात 101.13 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.100 टीएमसी पाणीसाठा झालेनंतर प्रतिवर्षी परंपरेनुसार कोयना धरणातील शिवसागर जलाशयाचे जलपुजन व ओटीभरण करण्याची पंरपरा आहे.पाटण तालुक्यातील तमाम जनतेने मला या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिल्यामुळे राज्यातील सर्वात मोठया आपले कोयना धरणातील जलाशयाचे जलपुजन व ओटीभरण करण्याची संधी मला गेली चार वर्षे मिळत आहे मी स्वत:ला खुप भाग्यवान समजत असून ही संधी मला मिळवून देणा-या पाटण तालुक्यातील तमाम जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो. कोयना धरण बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंता वैशाली नारकर,कोयना धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील, उपअभियंता मोरे आणि त्यांचे सर्व सहकारी व व्यवस्थापन कोयना धरणाच्या संदर्भात 24 तास कार्यरत आहेत. तसेच कोयना धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर नदीकाठच्या गांवामध्ये दक्षता घेण्याचे कार्य उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार रामहरी भोसले हे अधिकारी व त्यांच्या देखरेखीखाली महसूल प्रशासन कार्यरत आहे. कोयना धरणातील पाण्यामुळे अवघा महाराष्ट्र प्रकाशमान होत असून शेतीकरीताही या पाण्याचा चांगला वापर होत असल्याचे सांगून ते म्हणाले कोयना धरण आपले तालुक्यात आहे हे आपले सर्वांचे भाग्य असल्याची प्रतिक्रिया त्यांनी बोलताना व्यक्त केली.कोयना धरणातील शिवसागर जलाशयातील ओटी भरण व जलपुजन कार्यक्रमानंतर आमदार शंभूराज देसाई यांनी कोयना धरण प्रकल्पाचे अधिका-यांसमवेत कोयनानगर येथे बैठक घेतली. या बैठकीमध्ये कोयना धरण प्रकल्पाच्या संदर्भात त्यांनी विविध विषयांवर अधिकारी यांचेबरोबर चर्चा केली. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व ज्या काही समस्या शासन दरबारी प्रलंबीत आहेत त्या सोडविण्यासाठी वेळप्रसंगी मुख्यमंत्री यांची वेळ घेवून या समस्यांचे आपण निरसण करु अशी ग्वाही त्यांनी अधिका-यांना दिली.याप्रसंगी शिवदौलत बँकेचे संचालक अशोकराव पाटील,धोंडीराम भोमकर, माजी पंचायत समिती सदस्य हरीश भोमकर,संचालक बबनराव भिसे,प्रदीप पाटील,शैलेंद्र शेलार,दिलीप सकपाळ  या प्रमुख पदाधिकारी व कोयना धरण व्यवस्थापनाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.