कृष्णा कारखान्यात 5 लाख 11 व्या साखर पोत्याचे पूजन

कराड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सन 2018-19 च्या गळीत हंगामात उत्पादित झालेल्या 5 लाख11 व्या साखर पोत्यांचे पूजन कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. 4 लाख 14 हजार 730 मेट्रीक टन ऊसाचे गाळप होऊन 5 लाखांहून अधिक साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. कारखान्याचा दैनंदिन साखर उतारा 12.69 इतका असून सरासरी साखर उतारा 12.05 टक्के आहे. सध्या प्रतिदिन सरासरी 8 हजार मेट्रीक टनापेक्षा जादा ऊसाचे गाळप होत आहे.
को-जनरेशन प्रकल्पात आत्तापर्यंत पावणे दोन कोटी युनिट वीज निर्माण होऊन पाऊण कोटी युनिट वीज निर्यात केली आहे. तसेच डिस्टलरीमधून प्रतिदिन एक लाख लिटर्स अल्कोहोल निर्मीती होत आहे. कृष्णा कारखान्यातून तयार होणार्‍या द्रवरूप जीवाणू खताला व सेंद्रीय खताला शेतकर्‍यांकडून मोठी मागणी आहे. त्याचबरोबर व्हि.एस.आयच्या मार्गदर्शनानूसार तोडणी प्रोगॅ्रम कारखान्याने राबविला असून त्यामुळे या हंगामात साखर उतार्‍यात चांगली वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
जयवंत आदर्श कृषि ऊसविकास योजनेअंतर्गत कार्यक्षेत्रातील शेतकर्‍यांना चांगल्या प्रतीचे ऊसबियाणे, जैविक खते व मार्गदर्शन दिले जात असल्याने एकरी 100 टनांपेक्षा जास्त ऊस उत्पादन मिळत असून शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे अशी माहिती कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी यांनी दिली.
याप्रसंगी कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन लिंबाजीराव पाटील, संचालक दयानंद पाटील, धोंडिराम जाधव, गुणवंतराव पाटील, संजय पाटील, गिरीश पाटील, दिलीपराव पाटील, पैलवान शिवाजीराव जाधव, पांडुरंग होनमाने, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, व्हि.एस.आय शुगर टेक्नोलॉजी विभागप्रमुख आर.व्हि. दाणी, बहेचे उपसरपंच मनोज पाटील, हणंमत धर्मे, डि.के पाटील, वैभव जाखले, सेेके्रटेरी मुकेश पवार, जनरल मॅनेजर (टेक्निकल) पी.डी.राक्षे, प्रोसेस मॅनेजर डि.जी.देसाई, चिफ इंजीनीअर सुहास घोरपडे, असि. जनरल मॅनेजर डिस्टलरी प्रतापसिंह नलवडे, फायनान्स ऑफिसर सी.एन.मिसाळ, ईडीपी मॅनेजर अवधूत रेणावीकर, को-जनरेशन मॅनेजर गिरीश इस्लामपूरकर, मुख्य शेती अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील, सिनी. सिव्हील इंजीनीअर डि.व्हि.कुंभार, इरिगेशन मॅनेजर आर.जे.पाटील, मटेरिअल मॅनेजर रविंद्र देशमुख, पर्यावरण अभियंता सुयोग खानविलकर, वाहतुक अधिकारी गजानन प्रभुणे, स्टोअर किपर जी.बी.मोहिते, लेबर वेल्फेअर ऑफिसर अरूण पाटील, कार्यालयीन अधिक्षक अनिल पवार, सॅनेटेरी ऑफिसर व्हि.जी.पवार, संरक्षण अधिकारी संपतराव पाटील यांच्यासह सभासद, शेतकरी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.