महामार्गावर विरमाडे पुलाखाली संशयित वस्तूचा स्फोट ; एक कर्मचारी गंभीर जखमी

भुईंज : विरमाडे पुलाखाली सापडली स्फोटके महामार्गावरील आय.टी.डी.कंपनीचा कर्मचारी गंभीर जखमी, प्रसंगावधान राखल्याने पुढील अनर्थ टळला.  स्फोटकांचा आवाज व झालेला जाळ पाहून इतर कामगार धस्तावले.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सहापदरीकरणाचे काम रात्रंदिवस सुरू आहे. रिलायन्स अंतर्गत आय.टी.डी.कंपनी ही ठेकेदार असून त्या कंपनीने सब ठेकेदार इतर कंपन्यांना नेमले आहे.  शुक्रवारी दुपारी 4.30 वाजनेच्या दरम्यान टोलनाक्याजवळच असणार्‍या विरमाडे -उडतारे या दरम्यानचे पुलाचे बांधकामावर दोन तीन प्लास्टिकच्या व काचेच्या भरण्या आढळून आल्या यावेळी कामगार अजय मेहता (वय 37) हा भरणीचे झाकण काढणेसाठी गेला असता भरणीतून भला मोठा आवाज होवून ज्वाला बाहेर आल्या व संबंधित कामगाराचा हात भाजला प्रसंगावधान राखत इतर कामगारांनी त्यास सातारा येथील मोरया हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.

दरम्यान सापडलेल्या भरण्यात गोल आकाराचे गोळे होते.  त्यास निकामी करतानाच स्फोट होत असल्याने सर्वच कामगार घाबरले होते.  ही स्फोटके कोणती व कशासाठी पुलाखाली ठेवली याचा तपास होणे गरजेचे आहे.  या घटनेची नोंद भुईंज पोलीसात उशीरापर्यंत झालेली नव्हती.