Friday, March 29, 2024
Homeताज्या घडामोडीनिवडणूक कामात हलगर्जीपणा करणार्‍या लिपिकावर गुन्हा

निवडणूक कामात हलगर्जीपणा करणार्‍या लिपिकावर गुन्हा

वाई : शिरवळ ग्रामपंचायत (ता.खंडाळा) मधील लिपिक उत्तम तुकाराम दीक्षित (इङज) यांनी मतदारांना व्होटर स्लिप वाटप केले नसल्याने निवडणूक कामकाजामध्ये हलगर्जीपणा व टाळाटाळ केल्याने त्यांचेवर कारवाई करण्यात आली असून शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, 45 सातारा लोकसभा मतदार संघआंतर्गत 256 वाई विधानसभा मतदार संघाकरिता मा. निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार मा. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडून दि. 13 एप्रिल रोजी मतदारांसाठी व्होटर स्लिप प्राप्त झाल्या. सदर प्राप्त स्लिप केंद्रनिहाय केंद्रस्तरीय अधिकारी (इङज) यांना मतदारांना वाटप करण्यासाठी देण्यात आल्या होत्या. 256 मतदार संघात वाई, खंडाळा, महाबळेश्वर असे तीन तालुके येत असून प्रत्येक तालुक्यात केंद्रनिहाय केंद्रस्तरीय अधिकारी (इङज) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खंडाळा तालुक्यातील केंद्र 11 (गाव -शिरवळ) येथील (इङज) उत्तम तुकाराम दीक्षित लिपिक शिरवळ ग्रामपंचायत यांनी मतदारांना व्होटर स्लिप वाटप केल्या नाहीत. व्होटर स्लिप तात्काळ वाटप करण्याचे आदेश असून देखील दीक्षित यांनी व्होटर स्लिप वाटप केल्या नसल्याचे निदर्शनास आले. दरम्यान अत्यंत महत्त्वाच्या निवडणूक कामकाजामध्ये हलगर्जीपणा व टाळाटाळ केल्याने त्यांचेवर कारवाई करण्यात आली असून शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular