सातारा लोकसभा मतदारसंघासाठी 23 एप्रिल रोजी मतदान ; देशभरात सात टप्प्यात निवडणूक होणार ; मतमोजणी 23 मे रोजी

सातारा : भारताचे मुख्य निवडणुक आयुक्त सुनील अरोरा यांनी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. देशभरात सात टप्प्यात निवडणूक होणार आहे. १७ व्या लोकसभेसाठी आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे.

मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे.

साताऱ्यात 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे

 

देशभरात सात टप्प्यात निवडणूक होणार

११ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान*
१८ एप्रिल दुसरा टप्पा*
२३ एप्रिल तिसरा टप्पा*
२९ एप्रिल चौथा टप्पा*
६ मे पाचवा टप्पा*
१२ मे सहावा टप्पा*
१९ मे सातवा टप्पा*

 

२३ मे रोजी मतमोजणी

महाराष्ट्र मध्ये ४ टप्यात मतदान होणार आहे . सर्व मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅट मशिनचा वापर होणार आहे.

रात्री १० वाजल्यापासून सकाळी ६ पर्यंत लाऊड स्पीकरला मनाई करण्यात आली असून देशभरात आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे.
१६ व्या लोकसभेच्या तुलनेत १ लाख मतदान केंद्रे अतिरिक्त असणार, एकुण १० लाख मतदान केंद्रे असतील .
आचारसंहिता तोडल्यास सक्त कारवाई केली जाणार असून निष्पक्ष निवडणूक पार पडण्यासाठी कडक अंमलबजावणी करणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने केली .

लोकसभा निवडणुकीसाठी हेल्पलाईन नंबर १९५० असणार आहे .