महाबळेश्‍वर शहर व परिसरात धुवाँधार..

महाबळेश्वर : महाबळेश्वर व परिसरात गेल्या चार दिवसांपासून धुवाँधार पाऊस बरसत असून वेण्णालेकच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे महाबळेश्वर – पांचगणी मुख्य रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक काहीकाळ मंदावली होती.
महाबळेश्वर शहर व परिसरात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाची धुवाँधार बॅटिंग सुरू असल्याने चारच दिवसांमध्ये महाबळेश्वर – पांचगणीवासियांची तहान भागविणारे जीवनवाहिनी असलेले पर्यटकांच्या आकर्षणाचे ठिकाण,नौकाविहारासाठी प्रसिद्ध वेण्णा तलाव तुडुंब भरल्याने सांडव्यावरून पाणी वाहू लागले होते मात्र जुलैच्या दुसर्‍याच आठवड्यामध्ये पावसाने दडी मारल्याने एन पावसाळी हंगामात कधीनव्हे ते महाबळेश्वरवासियांना सूर्यदर्शन झाले आता मात्र या महिन्याच्या उत्तरार्धात गेल्या चार दिवसांपासून पावसाने पुन्हा एकदा कमबॅक केले असून धुवाँधार पावसाने महाबळेश्वर शहर व परिसराला अक्षरश झोडपून काढले आहे.वेण्णालेकच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून महाबळेश्वर पांचगणी मुख्य रस्त्यावर पाणीआल्याने जलमय झल्याचे चित्र होते.