सलग सुट्यांमुळे महाबळेश्वर पर्यटकांनी बहरले

महाबळेश्वर :(संजय दस्तुरे) नाताळसह नवीन वर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वर नगरी सजली असून येणार्‍या पर्यटकांच्या स्वागतासाठी येथील प्रसिद्ध बाजारपेठेतील व्यापारी मंडळीनी संपूर्ण  बाजारपेठेत विद्युत रोषणाई केली असून ते यावेळी आलेल्या पर्यटकांचे विशेष आकर्षण झाले आहे. या विद्युत रोषणाई मुळे संपूर्ण  बाजारपेठ उजळून निघाली आहे. हे दृश्य अत्यंत मनमोहक दिसत आहे.   आल्हादायक वातावरण, नाताळसह आलेली शनिवार रविवारची सलग सुट्टी व नवीन वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी यामुळे महाबळेश्वर मध्ये हौशी मौजींची गर्दी वाढली असून सर्व ठिकाणी पर्यटकांची गर्दी पहावयास मिळत आहे.