बंदला महाबळेश्‍वरमध्ये संमिश्र प्रतिसाद तर पाचगणी येथे कडकडीत बंद

महाबळेश्‍वर : भिमा कोरेगाव येथे सोमवारी घडलेल्या घटनेच्या निषधार्थ दलित संघटनांनी पुकारलेल्या बंदला महाबळेश्‍वर येथे प्रतिसाद मिळाला नाही. मात्र येथील दलित समाजाने मोर्चा काढुन दंगलीला जबाबदार असलेल्या आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. महाराष्ट् बंद आंदालनामुळे एस टी वाहतुकीवर चांगला परीणाम झाला. शहरातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. पांचगणी येथे मात्र कडकडीत बंद पाळण्यात आला. येथील पर्यटकांनी महाबळेश्‍वर येथे येणे पसंत केले.
भिमा कोरेगाव येथील घटनेच्या निषधार्थ पुकारण्यात अलेल्या बंद बाबत चर्चा करण्यासाठी येथील मान्यवरांची एक बैठक मंगळवारी रात्री पोलिस ठाण्यात पार पडली महाबळेश्‍वर हे पर्यटन स्थळ आहे येथील लोकांची उपजिवीका ही पर्यटनावर अवलंबुन आहे.
एक दिवस बंद पाळला तर पुढील आठ दिवसांच्या व्यवसायावर परीणाम होतो म्हणुन या बैठकीत बंद न पाळता भिमा कोरेगाव येथील घटनेचा शांततेच्या मार्गाने निषेध करण्याचा निर्णय घेण्यात आला खबरदारीचा उपाय म्हणुन पोलिस निरिक्षक दत्तात्रय नाळे यांनी शहरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता बैठकीत ठरल्या प्रमाणे आज येथील सर्व व्यवहार सुरळीत होते पर्यटकांना काहीही त्रास झाला नाही. मात्र एस टी वाहतुकीवर महाराष्ट् बंदचा चांगला परीणाम झाला काला रात्री मुक्कामी गेलेल्या अनेक बसेस आज परत आल्या नाही आज येथुन सकाळी पुणे येथे एक व मुंबईला एक बस सोडण्यात आल्या नंतर लांब पल्ल्याच्या सर्व बसेस रद्द् करण्यात आल्या महाबळेश्‍वर वाई व महाबळेश्‍वर मेढा या बरोबरच येथील ग्रामिण भागात जाणारी वाहतुकी सुरळीत सुरू ठेवण्यात आली आज दुपारी येथील तालुका झोपडपट्ट्ी सुरक्षा दलासह इतर दलित संघटनांच्या वतीने शहर अध्यक्ष रूषीकेश वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली बाजारपेठेतुन मोर्चा काढण्यात आला या मोर्चा मध्ये महीलाही मोठया संख्येने सामिल झाल्या होत्या मार्चेकरी यांनी येथील छ शिवाजी महाराज चौकातुन प्रारंभ केला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयांना पुष्पहार अर्पण करून मार्चा तहसिल कार्यालयावर नेला तेथे तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले या मध्ये भिमा कोरेगाव येथील दंगलीला जबाबदार असेलेल्या गुन्हगारांवर शासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या मोर्चा मध्ये रूषीकेश वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चामध्ये योगिता आगवणे नितीन चव्हाण अक्षय वायदंडे संजय बोभाटे विरेंद्र भोसले सरीता चव्हाण आदी मान्यवरांसह दलित बांधवांनंी मोठया संख्येने सहभाग घेतला होता.