पोलीस तपासात मैलाचा दगड ठरलेले महाबळेश्वर ट्रेकर्स   

सातारा  :  अपघात, हत्या, आत्महत्या तसेच नैसर्गिक आपत्ती आली की, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर ट्रेकर्स सर्वांना मदतीसाठी धावून आल्याचे पाहिले आहे. त्यांच्यामुळे सातारा पोलीस तपासात मदत झाली आहे. त्यामुळे महाबळेश्वर ट्रेकर्स मैलाचा दगड ठरला आहे.     जावळी तालुक्यातील मार्ली घाटात दोन दिवसात चार मृत्युदेह  शोधून देण्याची जबाबदारी पार पाडली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की,  महाबळेश्वर ट्रेकर्स चे सदस्य सुनील बाबा भाटिया यांना दि ११ ऑगस्टमध्ये  मेढा पोलीस स्टेशन येथून फोन आला कि मार्ली घाटात एक पुरुष जातीचा मृतदेह आहे तुम्ही टीम घेऊन मृतदेह काढायला या.नेहमी प्रमाणे महाबळेश्वर ट्रेकर्स ची टीम आवश्यक साहित्य घेऊन  घटनास्थळी रवाना झाली व पाऊण तासाच्या प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.                      त्यानंतर वीस दिवसाने म्हणजे दि.२९ ऑगस्ट  रोजी पुन्हा मेढा पोलीस स्टेशन मधून फोन आला की त्याच घाटात एका महिलेचा मृतदेह दरी मध्ये आहे. पुन्हा महाबळेश्वर ट्रेकर्स च्या टीम  दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर मार्ली घाटातून  त्या महिलेचा मृतदेह बाहेर काढण्याचे काम करून पोलीस तपासाला गती देण्याचे कार्य केले.  दि.३१  ऑगस्ट  रोजी पुन्हा दुपारी तीन वाजता  मेढा पोलीस स्टेशन येथून तिसऱ्यांदा फोन आला. त्याच मार्ली घाटात  दोन पुरुष जातीचे  मृतदेह खोल दरीत आहे. खोल दरी असल्यामुळे शोध मोहीमेला वेळ लागला. पण,  दिड तास अथक प्रयत्न करून महाबळेश्वर ट्रेकर्स ला मृतदेह हाती लागला. आणखी एक मृत्युदेह शोधून काढण्यापूर्वी  अंधार पडल्यामुळे शोध मोहीम थांबावावी लागली.               सकाळी ९ वाजल्यापासून शोध मोहीम पुन्हा सुरु केली. भर पावसात पावसाची व स्वतःच्या जीवाची पर्वा न करता महाबळेश्वर ट्रेकर्स च्या लढाऊ जवानांनी  शोधमोहिम राबवली आणि चौथा मृत्युदेह मार्ली घाटातून वर रस्त्यावर आणला. विशेष म्हणजे ज्यांची हत्या झाली ते सांगली जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील आहे तर हत्यारा हे सोमर्डी ता जावळी येथील असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.

उन्ह, वारा, पाऊस याची तमा न बाळगता अनिल केलनगे, जयवंत बिरामणे संदिप जांभळे, रवि झाडे, जॉन धन डायस, सुनिल केलनगे, अक्षय माने, निलेश बावलेकर, सोमनाथ वाघमारे, सूर्यकांत शिंदे, ओंकार नाविलकर यांच्या सह सर्व महाबळेश्वर ट्रेकर्स यांच्या कामगिरीने पश्चिम महाराष्ट्रात नावलौकिक प्राप्त केले आहे.