महाबळेश्वर अर्बन बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

????????????????????????????????????

महाबळेश्वरः बँकेचे सर्व सभासद ,ठेवीदार ,कर्जदार यांच्या सहकार्यामुळे अहवाल सालात बँकेची प्रगती पथावर वाटचाल सुरु असून बँकेला या वर्षी 40 लाख 69 हजार ढोबळ नफा झाला आहे. बँकेच्या एकूण ठेवी 59 कोटी 36 लाख झाल्या असून 35 कोटी 94 लाख रुपयांचे कर्ज वाटप केलेले आहे .कर्ज वाटप करताना अधिकतम कर्ज हे  तारण व कारण पाहून अदा करण्यात आलेले आहेत .अशी माहिती महाबळेश्वर अर्बन बँकेचे अध्यक्ष राजेश उर्फ बंडा  कुंभारदरे यांनी दिली .
दि महाबळेश्वर अर्बन को.ओप.बँकेची 83 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे अध्यक्ष राजेश उर्फ बंडा  कुंभारदरे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील माखरिया हायस्कूल च्या भव्य हॉल मध्ये अत्यंत खेळी मेळीच्या वातावरणात नुकतीच संपन्न झाली .यावेळी केलेल्या मार्गदर्शनपर भाषणात अध्यक्ष राजेश कुंभारदरे यांनी वरील माहिती दिली .यावेळी बँकेचे उपाध्यक्ष चंद्रकांत बावळेकर ,संचालक बाळकृष्ण कोंडाळकर ,दतात्रय वाडकर ,युसुफभाई शेख ,सचिन धोत्रे ,दिलीप रिंगे ,समीर सुतार ,नंदकुमार वायदंडे ,बाबू कात्रट ,जावेद वलगे, संचालिका सौ. वृषाली डोईफोडे ,तज्ञ संचालक प्रकाश डोईफोडे ,संजय संभाजी पारठे ,इरफान शेख, बँकेचे कायदा सल्लागार व्ही.एन. भोईटे वकील ,संजय जंगम वकील, सल्लागार समितीचे नंदकुमार बावळेकर ,अफझल पटेल,सुरेश शिंदे ,गजानन फळणे,बँकेचे मुख्य व्यवस्थापक उमेश बगाडे व शाखाधिकारी बाळकृष्ण साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते .
अहवाल सालात बँकेचा कारभार काटकसरीने करताना अनेक अनावश्यक खर्चांमध्ये लक्षणीय कपात केलेली आहे. गतवर्षी पेक्षा सुमारे 22 लाख रुपये  जादा कर्ज व्याज बँकेने वसूल केले आहे.तसेच अधिकतम  तरतुदी करताना रिझर्व बँकेच्या  निकषांप्रमाणे बँकेने पर्याप्तता प्रमाण हे 19.43 टक्के सर्वोत्तम ठेवलेले आहे असे सांगून अध्यक्ष राजेश कुंभारदरे पुढे म्हणाले कि बँकेच्या प्रत्येक ठेवीदाराच्या एक लाख रुपयांपर्यंत च्या ठेवीना विमा संरक्षण उपलब्ध करून दिले आहे तसेच सभासद अपघात विमा समूह योजना अंतर्गत नेशनल इंन्शुरंस  कंपनीच्या सहकार्याने सभासदांचा अपघाती मृत्यू झाल्यास वा त्याला कायमचे अपंगत्व आल्यास त्यास तीन लाख रुपये विमा सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. बँकेच्या सेवक वर्गाला रुपये दोन लाख पर्यंतचे वैध्यकीय विमा संरक्षण आणि सहा टक्के व्याज दराने कर्ज अर्थ सहाय्य सुरु केले आहे.
स्पर्धात्मक युगात चांगले कर्जदार – खातेदार  संस्थेकडे आकर्षित व्हावेत यासाठी वाहन तारण कर्ज योजना ,शैक्षणिक कर्ज योजना ,महिला बचतगट कर्ज योजना ,व्यापारी कॅश क्रेडीट योजना यांच्या वरील व्याज दरात बँकेने  कपात केली आहे. तर  सोने तारण कर्ज योजना अल्प व्याज दरात सुरु करण्यात आलेली आहे.
बँकेची स्वत:ची मोबाईल एपद्वारे मोबाईल बँकिंग सेवा ,कॅश डीपॉझीट मशीन सुविधा तसेच तातडीने प्रिंटींग सेवा उपलब्ध करून दिली जाणार असून मोफत कायदे विषयक सल्ला केंद्र तसेच  जेष्ठ सभासदांसाठी विरंगुळा केंद्र व सहकार ग्रंथालय आदींची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
बँकेचे वसूल भाग भांडवल 2 कोटी 21 लाख 24 हजार रुपयांचे असून बँकेचा राखीव व इतर निधी 7 कोटी 69 लाख 3 हजार रुपयांचा आहे असे सांगून अहवाल सालात बँकेने  8 टक्के  लाभांश जाहीर केला असून रिझर्व बँकेच्या परवांगीनंतर लाभांशाचे वाटप करण्यात येईल अशी हमी हि अध्यक्ष कुंभारदरे यांनी  यावेळी सभासदांना दिली. रिझर्व बँकेच्या जाचक अटी व नियम याच बरोबर वसुलीची आवाहने यातून स्थिर व भक्कम वाटचाल करीत असून बँक संचालक मंडळाच्या नि:स्वार्थी व पारदर्शक कारभारामुळे लक्षणीय प्रगती करीत असल्याची खात्री अध्यक्ष राजेश कुंभारदरे यांनी आपल्या भाषणात शेवटी दिली .
यावेळी  बँकेचे सभासद व नगरसेवक रवींद्र कुंभारदरे ,मधुसागरचे चेअरमन संजू बाबा गायकवाड ,माजी संचालक प्रभाकर कुंभारदरे ,भाईमिया मानकर ,शंकर दादा भिलारे ,माजी सभापती विजय भिलारे ,अनिल भिलारे ,शांताराम धनावडे यांनी सभासदांच्या व बँकेच्या हिताचे विविध प्रश्न मांडले त्यास संचालक मंडळाने समाधानकारक उत्तरे दिली .
प्रारंभी संचालक नंदकुमार वायदंडे यांनी उपस्थित सर्व सभासदांचे स्वागत केले त्यानंतर उपाध्यक्ष चंद्रकांत बावळेकर यांनी अहवाल सालात दिवंगत झालेल्या अर्बन बँक परिवारातील सर्वाना तसेच विविध क्षेत्रातील दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यासाठीची सूचना मांडून दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली .कार्यक्रमाचे सूत्र संचालन बँकेचे पासिंग ऑफिसर फकीरभाई वलगे यांनी केले तर आभार प्रदर्शन संचालक सचिन धोत्रे यांनी केले.
बँकेच्या सभेस माजी सभापती जेष्ठ सभासद धोंडीराम बापू जाधव ,एम. पी. फळणेगुरुजी ,महाबळेश्वरचे उपाध्यक्ष अफझलभाई सुतार ,नगरसेवक कुमार शिंदे ,जेष्ठ सभासद बबन यशवंत बावळेकर ,मधुसागरचे व्यवस्थापक महादेव जाधव ,माजी संचालक किशोर कोमटी , गोपाळ लालबेग ,डॉ.झरिना मुलाणी,अरविंद वाईकर ,कासम महापुळे,तुकाराम बावळेकर ,आसिफभाई मुलाणी,आसिफभाई मानकर ,जमालभाई  शेख ,छोटूभाई वाईकर ,अशोक शेटेपाटील ,रामभाऊ शिंदे ,विजय  नायडू ,नाना कदम ,नितीन परदेशी ,बँकेचे माजी व्यवस्थापक विजय पोतदार ,जगन्नाथ उर्फ आप्पा कोंडाळकर आदी सभासद  मोठ्या संख्येने उपस्थित होते .
(छायाः संजय दस्तुरे ,महाबळेश्वर)