महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकार्‍यांकडून महाबळेश्‍वर सांडपाणी प्रकल्पाची पाहणी

महाबळेश्‍वर : गेली अनेक वर्षे बंद असलेला सांडपाणी प्रकल्प तातडीने सुरू करण्या बाबत प्रदुषण नियंत्रण मंडळाने आदेश दिले असतानाही आज पर्यंत सांडपाणी प्रकल्प बंद अवस्थेत आहे या प्रकल्पाची पाहणी महाराष्ट् प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी बी एम कुकडे यांनी आज केली. दरम्यान पालिकेत कुकडे यांची भेट घेवुन नगरसेवक संजय पिसाळ यांनी या प्रकरणी पालिकेेच्या मुख्याधिकारी यांचेवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.
सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे 4 दशलक्ष व 1 दशलक्ष क्षमतेचे दोन प्रकल्प पालिकेने उभारले आहेत हे दोन्ही प्रकल्प बंद पडले होते प्रदुषण नियंत्रण मंडळाने हे दोन्ही प्रकल्प सुरू करण्या बाबत वारंवार नोटीसा बजावल्या होत्या परंतु पालिकेने या नोटीसांकडे दुर्लक्ष केले पालिकेच्या हलगर्जी पणामुळे सांडपाणी प्रकल्प गेली अनेक महीन्यां पासुन बंद आहे हे प्रकल्प बंद असल्याने सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच ते थेट जंगलात सोडण्यात आल्याचे दिसत आहे हा प्रकल्प बंद असल्याने या प्रकल्पा शेजारी असलेल्या दलित वसाहती मध्ये प्रचंड दुर्गंधी सुटते या दुर्गंधीमुळे या वसाहती मध्ये नागरीकांना राहणे मुष्कील झाले आहे या संदर्भात वाढत्या तक्रारी आल्याने नगरसेवक संजय पिसाळ यांनी पत्रकारां बरोबर हॉटेल व्हॅल्यु व्हयु शेजारी असलेल्या सांंडपाणी प्रकल्पाची पाहणी केली तेव्हा हा प्रकल्प बंद असल्याचे दिसुन आले तेथे पालिकेचा कोणताही कर्मचारी उपस्थित नव्हता याच ठिकाणी सांडपाण्याची प्रचंड दुर्गंधी सुटली होती सांडपाणी प्रकल्पाच्या शेवटी पाहणी केली असता या प्रकल्पाच्या टाक्या पुर्ण क्षमतेने भरल्या होत्या व त्या मैलासहीत वहात होत्या हा मैला थेट जंगलात सोडण्यात आले असल्याचे निदर्शनास आले या प्रकल्पाची पाहणी करीत असतानाच तेथे प्रदुषण नियंत्रण मंडळाचे वाहन चालक माने तेथे आले व त्यांनी उघडयावर सोडण्यात आलेल्या सांडपाण्याची पाहणी केली व जंगलात सोडण्यात आलेल्या सांडपाण्याचे नमुणे घेतले
सांडपाणी प्रकल्पाची पाहणी केल्या नंतर नगरसेवक पालिकेत गेले तेथे मुख्याधिकारी यांच्या दालनात महाराष्ट् प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी बी एम कुकडे हे तेथे बसले होते नगरसेवक यांनी कुकडे याना बंद असलेल्या सांडपाणी प्रकल्पा बाबत सविस्तर चर्चा केली पिसाळ म्हणाले की आपण हा प्रकल्प गेली अनेक महीने बंद अवस्थेत आहे त्या मुळे या प्रकल्पाची दुरावस्था झाली आहे आपण हा प्रकल्प सुरू करण्या बाबत वारंवार नोटीसा पालिकेला बजावता परंतु पालिका दुर्लक्ष करते मागील दोन महीन्यां पुर्वी देखिल आपण नोटीस दिली होती या नोटीसा मध्ये आपण पालिकेला एक महीन्यांची मुदत दिली होती परंतु त्यास आता दोन महीने झाले तरी हा प्रकल्प सुरू करण्यात पालिकेला यश आले नाही तेव्हा आपण केवळ नोटीसा देणे बंद करून पालिकेच्या कारभारास मुख्याधिकारी यांना जबाबदार धरून त्यांचेवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली हा प्रकल्प सुरू करण्या बाबत पालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत जी कामे करणे आवश्यक आहे त्या कामाच्या निवदा प्रसिध्द करण्यात आल्याची माहीती मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांनी नगरसेवक संजय पिसाळ यांना दिली या माहीतीने पिसाळ यांचे समाधान झाले नाही त्यांनी पुन्हा पालिकेवर कडक कारवाई करण्याची मागणी कुकडे यांचेकडे केली
पालिकेचा सांडपाणी प्रकल्प बंद आहे या मध्ये कोणाचेही दुमत नाही महाराष्ट् प्रदुषण नियंत्रण मंडळाने नोटीसा देवुनही पालिकेने हा प्रकल्प सुरू केला नाही आजही हा प्रकल्प बंद आहे या बाबत मी पुढील कारवाई साठी माझा अहवाल वरीष्ठांकडे पाठविणार असुन वरीष्ठांकडुन जे निर्देश येतील त्या प्रमाणे पालिकेवर कारवाई करण्यात येईल अशी माहीती महाराष्ट् प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी बी एम कुकडे यांनी वार्ताहरांशी बोलताना दिली
गेली पाच वर्षां पासुन हा प्रकल्प बंद असल्याची कबुली मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांनी दिली असे असतानाही प्रदुषण नियंत्रण मंडळाने पालिकेवर कोणतीच कारवाई केली नाही त्या मुळे पालिकेचे व प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांच्यात अर्थपुर्ण संगनमत असल्याची चर्चा शहरात सुरू असुन आता मंडळ पालिकेवर कोणती कारवाई करणार या कडे नागरीकांचे लक्ष लागुन राहीले आहे