सलग तिसर्‍या दिवशी महाबळेश्‍वरमध्ये हिमकण नगराध्यक्षांसह नगरसेविकांनी लुटला हिमकणाचा आनंद, नव वर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्‍वर सज्ज

महाबळेश्‍वर : एकाच वेळी सलग तिसर्‍या दिवशी हिमकण दिसल्याने ते पाहण्यासाठी व त्याचा आनंद लुटण्यासाठी भल्या सकाळीच पर्यटकांची वेण्णा तलाव परिसरात प्रचंड गर्दी .महाबळेश्वरच्या नगराध्यक्षा सह नगरसेविकांना हि हिमकण आनंद लुटण्याचा मोह आवरला नाही. पर्यटकांनी नविन वर्षाचे स्वागत महाबळेश्वर मध्ये धूम धडाक्यात व जल्लोषात करीत असताना च निसर्गाच्या या दुर्मिळ खजिन्याचा आनंद हि मुक्तपणे लुटावा असे आवाहन नगराध्यक्षा सौ.स्वप्नाली शिंदे यांनी केले आहे.
निसर्गाची जादूनगरी महाबळेश्वर मध्ये या वर्षी प्रथमच सलग तीन दिवस हिमकण पहावयास मिळत असून एकाच वेळी सलग तिसर्‍या दिवशी हिमकण दिसल्याची हि दुर्मिळ घटना असल्याने ते पाहण्यासाठी आज भल्या सकाळीच पर्यटकांसह स्थानिकांनी येथील प्रसिद्ध वेण्णा तलाव परिसरात एकच गर्दी केली होती .महाबळेश्वरच्या नगराध्यक्षा सौ. स्वप्नाली शिंदेंसह नगरसेविका आफरीन वारुणकर यांचाही यात सहभाग होता त्यामुळे आज भल्या सकाळचे वेण्णा तलाव जे टी वरील गर्दीचे दृश्य पाहिल्यावर नौकाविहारासाठी ची हि नेहमी दिसणारी दुपारची तर गर्दी नाही ना अशी शंका पाहणार्‍याला येत होती .
दरम्यान ह्या वर्षी थंडीच्या मोसमातील कडाक्याच्या थंडीमुळे दवबिंदू गोठून हिमकण दिसण्याची आजची हि चौथी वेळ असून सलग तीन दिवस हिमकण दिसण्याची हि पहिलीच वेळ आहे . या वर्षी 11 डिसेंबर रोजी प्रथम हिमकण तयार झाले होते .तर 28 ,29 व आज 30 डिसेंबरला पुन्हा सलग हिमकण दिसल्याने त्याचा आनंद स्थानींकांसह पर्यटकांना मोठ्या प्रमाणात घेता आला .आज पर्यंतची हिमकण तयार झाल्याची नोंद पाहता सलग हिमकण तयार होण्याचा विक्रम बर्‍याच वर्षानंतर या वर्षी प्रथमच आला आहे असे जाणकारांचे मत आहे. गेले चार दिवस या गिरीशिखरावर प्रचंड थंडी होती .आजही येथील थंडीचा जोर कायम आहे .या सलगच्या सतत वाढत्या थंडीमुळे शहरात सुमारे 9 नीचांकी तापमान तर वेण्णा तलाव -लिंगमळा परिसरात ते 2 अंश सेल्सियार ईतके नीचांकी होते यामुळे गेले तीन दिवस सतत वेण्णा तलाव -लिंगमळा परिसरात दवबिंदू गोठून त्याचे हिमकण झाल्याचे सुखद चित्र दिसत होते . वेण्णा तलावावरील जे टी , याच परिसरातील वाहनाचे टप ,स्मृतीवनातील वेली ,रानफुले ,झाडे झुडुपे ,गवताचे पठार सर्वत्रच हिमकण च हिमकण यामुळे पांढरा शुभ्र भाग झाल्याचे पहावयास मिळत होते . संधी मिळेल तेथे त्याचा आनंद स्थानिकांसह पर्यटक मोठ्या संख्येने घेताना दिसत होते .या वर्षी सलग हिमकणाची मौज ऐन नविन वर्षाच्या स्वागता च्या दरम्यानच मिळाल्याने या गिरीशिखारावर वेगळाच माहोल व उत्साह दिसत आहे.दरम्यान आज महाबळेश्वरच्या प्रथम नागरिक सौ. स्वप्नाली शिंदें सह नगरसेविका आफरीन वारुणकर यांनी हि भल्या पहाटे पासून वेण्णा तलाव व परिसरातील हिमकणाचा आनंद मुक्त पणे लुटला . नविन वर्षाच्या स्वागतासाठी हि नागरी सज्ज झाली असून येथील निसर्गही नटला आहे .येणारे पर्यटकही वाढत आहेत .महाबळेश्वर मध्ये या वर्षी हि दुर्मिळ संधी सर्वांसाठी असल्याने पर्यटकांसह सर्वानीच नविन वर्षाचे स्वागत धूम धडाक्यात व जल्लोषात करीत असताना च निसर्गाच्या या दुर्मिळ संधीचा व दुर्मिळ निसर्गाच्या खजिन्याचा आनंद मुक्तपणे लुटावा असे आवाहन नगराध्यक्षा सौ.स्वप्नाली शिंदे यांनी केले आहे.